बावधनजवळ बुलेट- टेम्पोच्या अपघातात 3 युवक जागीच ठार

बाबा तारे
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

अपघातात मृत्युमुखी झालेले तिन्ही तरूण बिहारचे आहेत. यातील विपूल व अमन हे एमआयटी महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत आहेत. तर आश्विन हा बीबीएला प्रवेश घेण्यासाठी पुण्यात आला होता . त्याचा भाऊ पुण्यात कायद्याचे शिक्षण घेत आहे. सदर अपघात एवढा भयानक होता की बुलेटचा चक्काचूर झाला आहे.

पुणे / औंध : मुंबई - सातारा महामार्गावर पाषाणकडून बावधन मार्गे कोथरूडला जात असताना महामार्गावर थांबलेल्या टेम्पोला भरधाव बुलेट अडकून तीन महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाले. यात विपूल राजसिंग (25), अमनराज सिंग (24), आश्विन अगरवाल (23)  हे तिघेजण जागीच ठार झाले.

मुंबईहून साताऱ्याला पीव्हीसी पाईप घेऊन जाणारा टेम्पो (एमएच 12 एमव्ही 5428) डिझेल संपल्याने बावधन येथे महामार्गावर डाव्या बाजूला थांबवला व चालक डिझेल आणायला गेला. त्यावेळी पहाटे दीडच्या सुमारास  दिडच्या सुमारास बभरधाव वेगाने येणारी बुलेट (बीएचआर 1 बीआर 7402) ही  टेम्पोला जोरात धडकली. यामुळे तिघांनाही गंभीर मार लागला व यात तिघेही जागीच ठार झाले. त्यांच्यासह दुसऱ्या दुचाकीवर सोबत असलेल्या मित्रांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. परंतु तोपर्यंत तिघेही मृत्युमुखी पडले होते.

टेम्पो चालकाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर हिंजवडी पोलिस ठाण्याचे वाहतुक विभागाचे निरिक्षक प्रकाश पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच हिंजवडी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असता त्या तरूणांच्या खिशात गांजा सापडल्याचे आढळून आले. रात्री हे सर्व तरूण कोथरूडला जाताना नशेत होते की नाही याची माहिती त्याचा अहवाल आल्या नंतरच कळू शकेल. पुढील तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

Web Title: pune news three die tempo bullet accident near bavdhan