पर्यटकांसाठी खास रेल्वेगाड्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे - देशातील विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळे पाहण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिस्ट कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) "भारत दर्शन तीर्थयात्रा' या नावाने पाच विशेष सहली आयोजित केल्या आहेत. त्यासाठी पुणे, सावंतवाडी, कोल्हापूर आणि नाशिकमधून पाच विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. 23 ऑक्‍टोंबर ते 5 डिसेंबरदरम्यान या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. 

"भारत दर्शन'ची पहिली गाडी 23 ते 30 ऑक्‍टोंबरदरम्यान पुण्याहून निघणार आहे. ही गाडी वैष्णोदेवी, सुवर्णमंदिर, जालियान वाला बाग, वाघा बॉर्डर आणि शिवखोरी आदी ठिकाणी जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी सात हजार 60 रुपये तिकीट असेल. "उत्तर दर्शन' ही गाडी 12 ते 21 नोव्हेंबरदरम्यान सावंतवाडीवरून निघेल. या सहलीत मथुरा, ताजमहाल आदी ठिकाणे पाहता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी 9 हजार 45 रुपये तिकीट असले. "पुरी व गंगा दर्शन' ही 8 ते 16 डिसेंबर यादरम्यान पुण्यातून सुटेल. या सहलीत जगन्नाथ मंदिर, कोणार्क मंदिर, काली मंदिर आदी ठिकाणे पाहता येणार आहेत. त्यासाठी प्रतिव्यक्ती आठ हजार 505 रुपये तिकीट असले. दुसरी "भारत दर्शन' गाडी 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान धावेल. या सहलीत उदयपूरमधील सीटी पॅलेस, कृष्ण जन्म भूमी, सुवर्ण मंदिर आदी ठिकाणी भेटी देण्यात येणार आहे. या गाडीचे प्रतिव्यक्ती 11 हजार 340 रुपये तिकीट असले. दक्षिण दर्शन सहल 2 ते 9 नोव्हेंबरदरम्यान असेल. तिरुपती, कन्याकुमारी, रामेश्वरम आदी ठिकाणे दाखविण्यात येणार आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी 7 हजार 560 रुपये तिकीट असले. तिकिटांमध्ये पर्यटन स्थळ पाहणे, राहणे आणि शाकाहारी जेवण यांचा खर्च समाविष्ट आहे, अशी माहिती आयआरसीटीसी पर्यटन विभागाचे गुरुराज सोना यांनी पत्रकार परिषदेत दिली. वरिष्ठ पर्यवेक्षक आलोकसिंह परमार या वेळी उपस्थित होते. 

Web Title: pune news Tourism railway bharat darshan