मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारी खेळणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

पुणे - ‘रंगोमेट्री’, ‘नंबर बॅलन्स’, ‘मॅथ्स किट’, ‘जॉमेट्रिक शेप’, ‘बेबी पझल’, ‘मॅजिक टॉवर’ या खेळाद्वारे अभ्यासासाठी उपयुक्त गोष्टी शिकता याव्यात, या संकल्पनेतून बाजारात विविध वयोगटांतील शालेय मुलांसाठी शैक्षणिक खेळणी उपलब्ध झाली आहेत.

पुणे - ‘रंगोमेट्री’, ‘नंबर बॅलन्स’, ‘मॅथ्स किट’, ‘जॉमेट्रिक शेप’, ‘बेबी पझल’, ‘मॅजिक टॉवर’ या खेळाद्वारे अभ्यासासाठी उपयुक्त गोष्टी शिकता याव्यात, या संकल्पनेतून बाजारात विविध वयोगटांतील शालेय मुलांसाठी शैक्षणिक खेळणी उपलब्ध झाली आहेत.

खेळणी म्हणजे लहान मुलांना आनंदाची पर्वणीच. या खेळण्यांतून आता मुलांना नवीन काही शिकताही येणार आहे. लहान मुलांसाठी अक्षर, शब्द, अंक, फुले आणि प्राणी यांची ओळख करून देणारी खेळणी, तर उपलब्ध आहेतच; त्याशिवाय ठोकळ्यांद्वारे मूलभूत वाक्‍यरचना, विविध आकारांची ओळख, पत्त्यांमधून गोष्ट सांगणारी खेळणी, तसेच शरीराच्या अवयवांची 
माहिती सांगणारी खेळणीही उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये गणित, भूगोल व विज्ञान यांसारख्या विषयांची गोडी निर्माण व्हावी, यासाठी ‘लाइफ सायकल’, ‘इंडिया अँड द वर्ल्ड’ यांसारखे ‘पझल गेम’ उपलब्ध आहेत. मुलांमधील वैज्ञानिक घडविण्यासाठी ‘द यंग सायंटिस्ट’सारख्या ‘ॲक्‍टिव्हिटी’ खेळांचीदेखील बाजारात चलती आहे.

यामध्ये रोबोट, एफएम रेडिओ, स्पोर्टस्‌ कार अशा विविध वस्तूंचे सुटे भाग आणि त्यासोबत एक मार्गदर्शिका दिलेली आहे. त्यानुसार सुट्या भागांची जोडणी करून मुले स्वतः नवीन उपकरण बनवू शकतात. यातून त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल. तसेच त्यांना या विषयाबद्दलची गोडी निर्माण होण्यास मदतही होईल. बाजारात उपलब्ध असणाऱ्या या शैक्षणिक खेळण्यांची किंमत ३०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत आहे.

मुलांच्या बौद्धिक पातळीचा 
विचार करून आम्ही गुणवत्तापूर्ण खेळणी तयार करतो. जोडो ठोकळे, शतक-दशक-एककसंच, गणितमाला, भौमितिक आकार संच, लाकडी कोडी, रगंमिती अशी खेळणी तयार केलीली आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी गणित, विज्ञान, भूगोल इत्यादी विषयांची माहिती व्हावी, यासाठी ‘शैक्षणिक खेळणी तयार केली आहेत. खेळाबरोबरच शैक्षणिक गोष्टींची माहिती मिळत असल्याने पालकांकडून अशा खेळण्यांना चांगली मागणी आहे.
- वर्षा खानवेलकर, व्यावसायिक

Web Title: pune news Toys for children's intelligence