लेण्याद्रीला 250 झाडांची लागवड

दत्ता म्हसकर
गुरुवार, 13 जुलै 2017

देवस्थान व ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोपांना ठिबक सिंचन करण्यात येणार असून शेळ्या व जनावरां पासून संरक्षण होण्यासाठी  देवस्थान मार्फत ट्री गार्ड देखील लावले जाणार आहेत. लागवड सुरू केल्यानंतर पाऊसही सुरू झाल्याने रोपे जगण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. 

जुन्नर - आज लेण्याद्रीला २५० वेगवेगळ्या पर्यावरणपूरक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. लेण्याद्री व ठाकरवाडी रस्त्याच्या दुतर्फा २५० विविध पर्यावरणपूरक झाडांची लागवड करण्यात आली.

त्यामध्ये वड, पिंपळ, हिरडा, बेहडा, अर्जुन सांदडा, खैर, चिंच,  जांभूळ, आवळा,  पुत्रजिवा, बेल, कदंब, करंज, हनुमान फळ व बकुळ इत्यादी वृक्षाची सहा फुटांपर्यंत वाढलेली रोपे लावण्यात आली. जुन्नर वनविभागाने मोठी व  सशक्त रोपे उपलब्ध करून दिली त्याबद्दल देवस्थान ने त्यांचे आभार मानले तसेच लागवडीसाठी खड्डे तयार करण्यासाठी झालेला खर्च  गणेशभक्त संजय माळी यांनी केला.

देवस्थान व ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोपांना ठिबक सिंचन करण्यात येणार असून शेळ्या व जनावरां पासून संरक्षण होण्यासाठी  देवस्थान मार्फत ट्री गार्ड देखील लावले जाणार आहेत. लागवड सुरू केल्यानंतर पाऊसही सुरू झाल्याने रोपे जगण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. 

यावेळी लेण्याद्री देवस्थान चे अध्यक्ष शंकरराव ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे विश्वस्त जयवंत डोके, मच्छिंद्र शेटे, जितेंद्र बिडवई, काशिनाथ लोखंडे कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवई व्यवस्थापक निलेश सरजिने देवस्थानचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: pune news tree plantation in Lenyadri