पुणे: मावळात आदिवासींचा जीव धोक्यात घालून पायी प्रवास

रामदास वाडेकर
शनिवार, 29 जुलै 2017

या वर्षी तर घाटातील दरड कोसळली आहे,त्यामुळे ओढयातून जाणाऱ्या पायी वाटेतील दगडी निखळून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत.ओढयातील पाण्याच्या अतिवेगाने मुळे पूरातून अलिकडे पलिकडे जाता येत नाही.

टाकवे बुद्रुक : आदिवासी दुर्गम पाडा अशी ओळख असलेल्या कळकराईकरांना जीव धोक्यात घालून पायी प्रवास करावा लागतोय. आयुष्य भराची ही पायपीट कधी संपणार याची आस कळकराई वासीयांना आहे. दरवर्षीच्या पावसात फेनादिच्या अवघड घाटाची चढण उतरण धो धो फेसाळत वाहणाऱ्या ओढयातून अलिकडे पलिकडे करताना यमसदनाचीच आठवण होते. 

या वर्षी तर घाटातील दरड कोसळली आहे,त्यामुळे ओढयातून जाणाऱ्या पायी वाटेतील दगडी निखळून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत.ओढयातील पाण्याच्या अतिवेगाने मुळे पूरातून अलिकडे पलिकडे जाता येत नाही. दरड कोसळल्याने पायीवाटेनेही जाता येताना भीतीने थरथर कापायला होत आहे. या वर्षी धो धो पडलेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील दगडी निसरडया झाल्या आहेत. 

सोबतीला कोणी असल्याशिवाय या बिकट वाटेने प्रवास करणे म्हणजे मृत्यू दाढे प्रवास केला सारखे असल्याचे चंद्रकांत कावळे, लक्ष्मण कावळे यांनी सांगितले. सावळा गावा पासून कळकराई पर्यत जाणारा हा ४ किलोमीटर लांबीचा घाट आहे.सावळयातून डोंगराची तीव्र उतरण उतरल्यावर अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर  हा ओढा आहे. 
डोंगर पठारावरील व माळरानातील खळळते पाणी याच ओढयातून खाली रायगड कडे धबधब्याच्या रूपाने कोसळते, याच ओढयातून कळकराईचा जगाला जोडणारा दुवा आहे. यंदाच्या पावसात हाच दुवा निखळला आहे. प्रशासनही गावकऱ्यांच्या मदतीला धावले नाही.त्यामुळे भर पावसातच गावकऱ्यांनी श्रमदानातून कोसळलेल्या दरडीच्या दगडी दूर केल्या आहेत. महाकाय ओढयातून आलिकडे पलिकडे जाण्यासाठी लाकडे आणि लोखंडी अॅगलचा आधार केला आहे. ओढयाच्या दोन्हीही बाजूला या लाकडांना आणि अॅगलला घट्ट बांधून ठेवले आहे. 

ओढयातील पाणी उत्तराच्या दिशेने वेगात धावत आहे, अशा वेळी पायी जाणाऱ्याला आधाराची गरज आहे. मात्र हा आधार तुटपुंजा ठरत आहे.पिढयान पिढयान गावकरी जीव मुठीत धरून जात आहे. महिन्यातून एकदा सगळया गावकऱ्यांना रेशनिंग घ्याला सावळयात यावेच लागते. शासकीय काम,बाजारहाट, नातेवाईकांना भेटायला या ना त्या निमित्ताने हा डोंगर द-या खो-याचा प्रवास कळकराई करांच्या नशीबीच आहे. 
यंदा तर दरड कोसळून, ओढयातील पूर्वीची वाट निखळून त्यांच्या पाऊलवाटात अजूनच विघ्न पडले आहे.विघ्नकर्त्या गणरायाचे यंदाचे आगमनही याच बिकट वाटेने होत आहे. की मावळातील कळकराई करांना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून होत आहे.विघ्नहर्त्या गणरायांनी शासनाला लवकर सुबुद्धी देवो आणि द-या खो-यातील कळकराईकरांचे लवकर पुनर्वसन करावे अशी मागणी गावकरी करीत आहेत. 

Web Title: Pune news tribal people issues