तृप्ती देसाईसह त्यांच्या पतीवर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल

रविंद्र जगधने
गुरुवार, 6 जुलै 2017

पिंपरी (पुणे) : दलित व्यक्तीला मारहाण करून त्याच्याजवळील 42 हजारांचा ऐवज लंपास केला. महिलांना सांगून खोटी तक्रार देईल व जातींचा उल्लेख करत या जातींनी आम्हाला संघटना चालवण्यास शिकवू नये. या आरोपावरून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (रा. धनकवडी) व त्यांच्या पतीसह इतर चार जणांवर मारहाण व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक (ऍट्रॉसिटी) कायद्याअंतर्गत हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याबाबत श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथील एका 33 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तृप्ती देसाई यांच्यासह त्यांचे पती प्रशांत देसाई, सतीश देसाई, कांतिलाल ऊर्फ अण्णा गवारे व इतर दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी बालेवाडी स्टेडियमकडून मुंबईच्या दिशेने सेवा रस्त्याने फिर्यादी त्यांच्या मोटारीतून तृप्ती देसाई यांच्याबरोबर जात असताना तृप्ती यांचे पती इतर संशयितांसह तेथे येऊन, त्यांची मोटार फिर्यादी यांच्या मोटारीला आडवी लावली. तृप्ती देसाई यांच्या विरोधात महत्त्वाचा पुरावा असलेले फिर्यादी यांचे मोबाईल काढून घेतले व त्यांचे पती व इतरांनी फिर्यादीस मारहाण केली. त्यांच्या जवळील 27 हजारांची रोकड व 15 हजारांची सोनसाखळी लंपास केली. तसेच तृप्ती यांनी "आमच्या विरोधात गेल्यास महिलांना सांगून तुझ्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करेल,'' अशी धमकीही दिली. त्याचबरोबर जातीचा उल्लेख केला, असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: pune news trupti desai and her husband Filed for atrocity