रुग्णाच्या पोटातून काढला सहा किलोंचा ट्यूमर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

पुणे - पोटात दुखणे व पोट जड वाटणे अशी तक्रार घेऊन उपचारासाठी ससूनमध्ये दाखल झालेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करून सहा किलोंचा ट्यूमर काढण्यात आला.

पुणे - पोटात दुखणे व पोट जड वाटणे अशी तक्रार घेऊन उपचारासाठी ससूनमध्ये दाखल झालेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करून सहा किलोंचा ट्यूमर काढण्यात आला.

मालतीदेवी अकालू रान ही मूळची बिहार येथील महिला पोटात गोळा आला असल्याच्या कारणास्तव ससून रुग्णालयात दाखल झाली होती. डॉक्‍टरांनी तिला तपासल्यानंतर तिच्या पोटात 30 बाय 30 सेंटिमीटरची गाठ आढळून आली. पोटातील गोळा आतड्यांना चिकटून उजव्या किडनीपासून आला होता. डॉक्‍टरांनी तो गोळा किडनीपासून वेगळा करून कोणत्याही अवयवांना इजा न करता तसेच रक्तस्राव न करता काढला. हा गोळा आकाराने गोलाकार व 5.75 किलो वजनाचा होता.

ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली डॉ. पी. एस. करमरकर, डॉ. लता भोईर, डॉ. माधुरी कांबळे, डॉ. अनिता घुगे, डॉ. केशव जिंदल, डॉ. गिरीश चौगुले यांनी ही अतिशय गुंतागुंतीची व दुर्मीळ शस्त्रक्रिया केली.

हा आजार दुर्मीळ असून, जगामध्ये अशा आजाराच्या फक्त 58 रुग्णांची नोंद आहे. आतापर्यंत किडनीपासून येणारा एवढ्या मोठ्या आकाराचा गोळा आढळून आलेला नाही.

Web Title: pune news tumor patient surgery