मोटार उलटून पुण्यातील दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

सोमाटणे - मोटार खड्ड्यात उलटून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला; तर दोघे जखमी झाले.

द्रुतगती मार्गावर आढे गावाच्या हद्दीत कि.मी.क्रमांक ७९ जवळ मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. प्रीतम विलास साळुंके (वय २५, रा. धायरी, पुणे), राहुल हनुमंत राजगुरू (वय २८, रा. धनकवडी, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. प्रतीक भास्कर आमरे (वय २६ रा. विठ्ठलवाडी, पुणे), स्वप्नील अनिल घोरपडे (वय २५, रा. स्वारगेट, पुणे) अशी जखमींची नावे आहेत. 

तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नील घोरपडे, प्रतीक आमरे व प्रीतम साळुंके हे तिघे मित्र कामानिमित्त सोमवारी सकाळी राहुल राजगुरू यांच्या मोटारीतून (एमएच १२ केएन ७५४५) मुंबईला गेले होते. तेथील काम आटोपून आज पहाटे अडीचच्या सुमारास ते द्रुतगती मार्गाने मुंबईहून पुण्याला यायला निघाले. पहाटे साडेपाचच्या सुमारास आढे गावाजवळ चालक राहुल राजगुरू याचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने मोटार रस्त्यालगतचा संरक्षक कठडा तोडून खोल खड्ड्यात जाऊन उलटली. त्यात डोक्‍याला जबर मार लागल्याने प्रीतम व राहुल यांचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक गंभीर जखमी झाला असून, त्याला महामार्ग पोलिसांनी उपचारासाठी निगडीतील लोकमान्य रुग्णालयात दाखल केले. स्वप्नील किरकोळ जखमी झाल्याने जागेवरच उपचार करून त्याला सोडण्यात आले.

Web Title: pune news two death in accident