इंदापूरजवळ अपघातात दोन जण ठार

डॉ. संदेश शहा
बुधवार, 31 मे 2017

या अपघातात मिनीबसमधील रियाज माणिक सुतार (वय 27) व कल्पना सुतार (वय 50) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर बसचालक माणीक सुतार यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

इंदापूर - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ तरंगवाडी गावाच्या हद्दीत तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातात दोन जण गंभीर जखमी असून, नऊ जण किरकोळ जखमी आहेत.

आज (बुधवार) सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबई येथून उमर रतन सुतार यांचे पार्थिव घेऊन रुग्णवाहिका व मिनी बसमधून (एमएच 04, एमके 1447) मयताचे नातेवाईक नागणेवाडी (ता. मंगळवेढा) येथे निघाले होते. इंदापूर बाह्यवळण रस्त्यावर सर्वजण लघुशंकेसाठी गाडीतून उतरले. यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने (टीएस 12 यूए 3613) मिनीबसला धडक दिली. त्यामुळे मिनीबस रुग्णवाहिकेवर जाऊन आदळली.

या अपघातात मिनीबसमधील रियाज माणिक सुतार (वय 27) व कल्पना सुतार (वय 50) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर बसचालक माणीक सुतार यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करत आहे. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
एसएमएसद्वारे जोडा पॅन आणि आधार: प्राप्तिकर विभाग
औरंगाबादमध्ये समृद्धी मार्गाच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर
बुलडाणा: पोलिसाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

योगी आदित्यनाथ अयोध्येत; 'जय श्रीराम'च्या घोषणा
काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ स्फोट
मॉन्सून 8 जूनला मुंबईत: हवामान विभाग​
लोकांनी काय खावे हे सरकार ठरवत नाही: केंद्रीय मंत्री
बीफ फेस्टिव्हलवरून विद्यार्थ्याला मारहाण​
मुख्यमंत्र्यांचा शेट्टी, जयंतरावांवर नेम; सदाभाऊंची ढाल​
दिल्ली आयआयटीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

जनावरे विक्री बंदीबाबत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सूट शक्‍य
शेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी

Web Title: pune news Two persons killed in an accident near Indapur