एकाच क्रमांकाच्या दोन एसटी गाड्या...

डी. के. वळसे पाटील
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

मंचर (पुणे) : राज्यपरिवहन महामंडळाच्या अनेक गमतीदार कथा ऐकायला व पाहावयास मिळतात. एकाच क्रमांकांच्या दोन एसटी गाड्यांची छायाचित्र सध्या सोशल मिडीयावर वायरल झाले आहे. या अजब कारभाराची चर्चा नागरिक व प्रवाशांमध्ये जोरदारपणे सुरु आहे. एम एच ४० ८५२६ या क्रमांकाच्या या दोन गाड्या योगायोगाने एकाच बस स्थानकावर शेजारी-शेजारी उभ्या राहिल्या होत्या.

एका चाणाक्ष प्रवाशाच्या ही बाब लक्षात आली. त्याने ताबडतोब फोटो काढून सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. संबंधित छायाचित्र पाहून नागरिक ही अचंबित झाले आहे. प्रादेशिक परिवहन विभाग (RTO)  यांच्याही हा प्रकार अजूनही लक्षात न आल्याने नागरिकांमधूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या दोन एसटी गाडयांचे एकच नंबर कसे हा विषय चर्चेचा ठरला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news two st bus with the same number...