Sun, June 4, 2023

Pune News : पुण्यातही धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ! 'या' दिवशी महाविकास आघाडीच्या सभेचे आयोजन
Published on : 12 March 2023, 10:52 am
पुणे - शिवसेनेचं मुळ पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यापासून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. थेट उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. कोकणात झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. आता उद्धव ठाकरेंची तोफ पुण्यात धडाडणार आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयानंतर आता 14 मे रोजी महाविकास आघाडीची पुण्यात विराट सभा होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षाचे वरिष्ठ नेते सहभागी होणार
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आयोजित मेळाव्यात विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी ही माहिती दिली. १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे आणि याच निमित्ताने पुण्यात महाविकास आघाडीची विराट सभा आयोजित करण्यात आल्याचं ते म्हणाले.