दोन ट्यूबमधून धावणार भूमिगत मेट्रो

मंगेश कोळपकर
शनिवार, 31 मार्च 2018

भूमिगत मेट्रोचे काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. देशातील सर्वोत्कृष्ट भूमिगत मेट्रो मार्ग आणि स्थानके उभारली जातील. त्यामुळे पुणेकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेट्रोची अनुभूती येईल.
- ब्रिजेश दीक्षित, कार्यकारी संचालक, महामेट्रो 

पुणे - मेट्रोच्या शिवाजीनगर - स्वारगेट दरम्यानच्या भूमिगत मार्गाची नेमकी अलाइनमेंट निश्‍चित झाली आहे. या मार्गावर पाच स्थानके असतील. मेट्रो मार्गात दोन वर्तुळाकार ट्यूब असून त्यातून मेट्रोची वाहतूक होणार आहे. या मार्गाच्या निविदा तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली आहे. त्यामुळे भूमिगत मेट्रोसाठी येत्या दोन महिन्यांत कामाला सुरवात होणार आहे. 

पिंपरी - स्वारगेट मार्ग - शिवाजीनगरमधील कृषी महाविद्यालय- स्वारगेट दरम्यान मेट्रो भूमिगत असेल - ५. ५ किलोमीटर 

भूमिगत मेट्रोचा मार्ग - कृषी महाविद्यालय, संचेती चौक, सीओईपीचे मैदान, धान्य गोदाम, नदीपात्राखालून, कुंभारवाडा, फडके हौद चौक, गवळी आळी, नेहरू चौक, शिवाजी रस्ता, स्वारगेट 

पाच ठिकाणी होणार स्थानके - शिवाजीनगर एसटी स्थानकाजवळ, शिवाजीनगर धान्य गोदाम, कसबा पेठ, महात्मा फुले मंडई, स्वारगेट 

पाचही स्थानके भूमिगत असून, किमान दुमजली होणार; धान्य गोदामाचे स्थानक बहुमजली 

सिमला ऑफिस चौकातून म्हणजेच आकाशवाणी केंद्रापासून शिवाजीनगर एसटी स्थानकापर्यंत सुमारे २० मीटर लांबीचा भूमिगत पादचारी मार्ग असणार 

भूमिगत मेट्रोसाठी स्वारगेट आणि कृषी महाविद्यालय चौकातून एकाच वेळी कामाला सुरवात होणार 

भूमिगत मेट्रोचा मार्ग आणि स्थानके जमिनीखाली किमान २०- २८ मीटर असतील. त्यामुळे कोणत्याही इमारतींना धक्का पोचणार नाही. 

भूमिगत मार्ग तयार करताना भूंकपरोधक तंत्रज्ञानाचा वापर होणार 

 

Web Title: pune news underground metro in tube