"युगपुरुष' गावोगावी पोचावे - उस्मान खॉं

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

पुणे - ""एखादी कला पाहताना रोमांचित होणे म्हणजे काय, भारून जाणे म्हणजे काय? हे "युगपुरुष : महात्मांचे महात्मा' नाटक पाहताना अनुभवता येते. असे नाटक गावोगावी पोचले पाहिजे. त्यामुळे गांधीजी पुढे महात्मा कसे झाले, हे समाजाला कळेल,'' असे मत ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खॉं यांनी व्यक्त केले. 

श्रीमद्‌ राजचंद्र मिशन यांच्या वतीने "युगपुरुष ः महात्मांचे महात्मा' या मराठी नाटकाचा रविवारी प्रयोग सादर झाला. श्रीमद्‌ राजचंद्र हे गांधीजींचे मित्रच नव्हते, त्यांच्या चरित्रघडणीतील प्रेरणा शक्ती व आध्यात्मिक मार्गदर्शकही होते. हा प्रवास यानिमित्ताने रंगमंचावर उलगडत गेला. प्रभावी संवाद, संगीत आणि रंगमंचीय व्यवस्था यामुळे हा प्रयोग वेगळेपण ठसवणारा ठरला. नाटकातील कलावंतांचा सत्कार खॉं आणि नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांच्या हस्ते करण्यात आला. 

खॉं म्हणाले, ""गांधीजींचे विचार तरुणांपर्यंत पोचवण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी नाटक हे एक प्रभावी माध्यम आहे.'' चापेकर म्हणाल्या, ""गांधीजी महात्मा झाले. कारण त्यांच्यामागे आणखी एक महात्मा होते. हे बऱ्याच लोकांना अजूनही माहिती नाही. ही वाटचाल आणि त्यांचे विचार समाजाला कळले पाहिजे.'' उत्तम गडा यांनी या नाटकाचे लेखन केले असून राजेश जोशी यांनी दिग्दर्शन केले आहे. 

Web Title: pune news Usman Khaan