अमेरिकेत आज विविध प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

‘गव्हर्नर’ पदाची निवडणूक लढविणाऱ्या डॉ. ठाणेदार यांचे मत

पुणे - ‘‘अमेरिका महासत्ता असली, तरी त्यांचे स्वत:चे बरेच प्रश्‍न आहेत. तेथील २२ टक्के मुलांना गरिबीमुळे चांगले शिक्षण घेता येत नाही. आरोग्य योजनांच्या लाभापासून वंचित असणारा मोठा वर्ग आजही तेथे आहे. या आणि अशा बऱ्याचशा सुधारणावादी कार्यक्रमांना महत्त्व देत मिशिगन येथील गव्हर्नर (राज्यपाल) पदाची निवडणूक लढवत आहे’’, असे उद्योजक, लेखक डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी गुरुवारी सांगितले. मी राजकीय व्यक्ती नाही. तरीसुद्धा मला तेथील जनतेचे प्रश्‍न माहिती असून, ते सोडविण्याची तळमळ मनात आहे, असेही ते म्हणाले.

मूळचे भारतीय असलेले डॉ. ठाणेदार हे अमेरिकेच्या मिशिगन राज्याच्या गव्हर्नर पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या ते पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी ‘सकाळ’च्या ‘फेसबुक लाइव्ह’ या व्यासपीठावरून महाराष्ट्रातील वाचकांशी संवाद साधला. लहानपणाचा संघर्ष, स्वत:च्या पायावर उभे राहून घेतलेले शिक्षण, परदेशात जाऊन मिळवलेली पीएचडी, तेथे उभारलेला उद्योग, जागतिक मंदीचा फटका, त्यातून सावरून पुन्हा नव्याने उभारलेले विश्‍व व तिथून निवडणुकीपर्यंतची वाटचाल यानिमित्ताने उलगडत गेली.

डेमॉक्रॅटिक पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी ऑगस्टमध्ये होणाऱ्या निवडणुकीला ठाणेदार यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी गर्व्हनरपदाची निवडणूक होणार आहे. यासंदर्भात ते म्हणाले, ‘‘हे पद नाममात्र पद नाही. आपल्याकडील मुख्यमंत्र्यांना जे अधिकार आहेत, तेच अधिकार अमेरिकेतील गव्हर्नरला असतात. मिशिगन राज्यात एक कोटी नागरिक आहेत. त्यातील एक लाख लोक भारतीय आहेत. त्यांच्याकडून पाठिंबा मिळत आहे; पण तो वाढला पाहिजे. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.’’

मी स्वत: एक व्यावसायिक असलो तरी, सुधारणेच्या हेतूनेच मी ही निवडणूक लढवणार आहे. निवडून आल्यानंतर सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन काम करण्यावर माझा भर राहील, असेही ते म्हणाले. 

पुन्हा श्री गणेशा
आयुष्यात आलेल्या खडतर प्रसंगावर ‘ही ‘श्री’ची इच्छा’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाची ४६वी आवृत्ती सध्या बाजारात आली आहे. आम्हाला जगण्याचे नवे बळ मिळाले, अशा वाचकांच्या प्रतिक्रिया अजूनही मला मिळतात. या पुस्तकानंतर ‘पुन्हा श्री गणेशा’ हे पुस्तक लिहिले आहे. ते ऑगस्ट महिन्यात वाचकांसमोर येईल’’, असे ठाणेदार यांनी जाहीर केले.

Web Title: pune news Various questions in America