‘वसंतोत्सवा’त उद्यापासून ताल-सुरांची बहार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

शुक्रवारपासून (ता. १९) सुरू होत असलेल्या यंदाच्या ‘वसंतोत्सवा’त शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन, प्राचीन संगीत नाटकांच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडविणारे ‘संगीत सौभद्र’, प्रख्यात तबलावादक पं. कुमार बोस आणि अनिंदो चटर्जी यांची तबला जुगलबंदी, लुई बॅंक्‍स-निर्वाणा यांच्या बॅंडचे फ्यूजन आणि तरुणाईचा आवडता सतारवादक नीलाद्री कुमार यांचे वैशिष्ट्यपूर्ण सतारवादन होत आहे. न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमध्ये हा महोत्सव होत आहे.

शुक्रवारपासून (ता. १९) सुरू होत असलेल्या यंदाच्या ‘वसंतोत्सवा’त शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन, प्राचीन संगीत नाटकांच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडविणारे ‘संगीत सौभद्र’, प्रख्यात तबलावादक पं. कुमार बोस आणि अनिंदो चटर्जी यांची तबला जुगलबंदी, लुई बॅंक्‍स-निर्वाणा यांच्या बॅंडचे फ्यूजन आणि तरुणाईचा आवडता सतारवादक नीलाद्री कुमार यांचे वैशिष्ट्यपूर्ण सतारवादन होत आहे. न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमध्ये हा महोत्सव होत आहे.

ख्यातनाम गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त ‘सकाळ’ प्रस्तुत करत असलेल्या या स्वरयात्रेसाठी ‘मराठे ज्वेलर्स’ टायटल स्पॉन्सर आहेत. पॉवर्ड बाय ‘रावेतकर ग्रुप’ या उत्सवासाठी ‘हॅशटॅग’ आणि ‘महामेट्रो’ सहप्रायोजक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. बॅंकिंग पार्टनर, ९१.१ एफएम रेडिओ सिटी रेडिओ पार्टनर, महेफिल केटरिंग सर्व्हिसेस, जनसेवा भोजनालय फूड पार्टनर, गिरिकंद हॉलिडेज ट्रॅव्हल पार्टनर, १०० टक्के पब्लिक रिलेशन्स पीआर पार्टनर, सेतू ॲडव्हर्टायझिंग कम्युनिकेशन पार्टनर आणि व्हाइट कॉपर प्रा. लि. एक्‍झिक्‍युटिंग पार्टनर आहेत.

‘वसंतोत्सव’ म्हणजे संगीतरसिकांना मेजवानी आहे. आम्ही २०१३ पासून वसंतोत्सवाचे असोसिएट पार्टनर आहोत. मी स्वतः शास्त्रीय संगीताचा चाहता आहे. वसंतोत्सवांतर्गत अनेक ख्यातनाम गायक आणि वादकांना ऐकण्याची संधी मिळते. पुणेकर या कार्यक्रमाची आवर्जून वाट पाहत असतात. पुणेकरांचा पॉझिटिव्ह फीडबॅकही मिळतो. दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यापासूनच वसंतोत्सवासंदर्भात विचारणा सुरू होते. अशा दर्जेदार व रसिकप्रिय कार्यक्रमासाठी असोसिएट पार्टनर म्हणून संलग्न होता येते व मोठा वाचकवर्ग असलेल्या ‘सकाळ’सारख्या माध्यमातून हजारो रसिकांपर्यंत आम्हाला पोचता येते. 
- मिलिंद मराठे, मराठे ज्वेलर्स, असोसिएट पार्टनर ‘वसंतोत्सव’

वसंतोत्सवाचा मी सुरवातीपासून एक घटक आहे. या कार्यक्रमाबाबत राहुलचे व्हिजन मला फार चांगले वाटते. पं. वसंतराव देशपांडे एक चतुरस्र कलाकार होते. ते गायचे, उत्तम तबला वाजवायचे, उत्तम अभिनयही करायचे. त्यांचा हा वारसा राहुलकडे आलाय. प्रत्येक जॉनरचे एक वैशिष्ट्य आहे, त्यातील विख्यात कलाकार आहेत. एकाच उत्सवात पुष्कळ तऱ्हेचे जॉनर ऐकायला मिळतात. लाइट, शास्त्रीय अशा सगळ्या प्रकारच्या संगीताचे बाज वसंतोत्सवात आहेत. गायकांसोबत अनेक प्रख्यात वादकसुद्धा येथे रसिकांना ऐकायला मिळतात. येथे येणारे कलाकार आहेत. त्यांचे संगीत, रसिकांना ऐकायला मिळते, याचा आनंद होत आहे. 
- पं. विजय घाटे, प्रसिद्ध तबलावादक

संगीतातून एकात्मता साधायचा ध्यास
‘मिले सूर मेरा तुम्हारा’च्या सुरावटीमुळे घराघरांत पोचलेले सर लुई बॅंक्‍स यांनी पाश्‍चात्त्य व भारतीय शास्त्रीय संगीताचा मिलाफ घडवणारे अनेक कार्यक्रम देश-परदेशांत केले आहेत. सखोल चिंतनाआधारे ते अभिजात संगीतातील अनोखेपणाबद्दल सांगत आहेत.

भारतीय अभिजात संगीताचं सौंदर्य त्याच्या उत्स्फूर्त आविष्कारात आहे. रागाची चौकट सांभाळूनही नित्य नव्या आविष्काराचं अद्वितीय वैशिष्ट्य इतर देशांमधल्या कलावंत व रसिकांच्या मनात कुतूहल निर्माण करतं. जॅझ संगीतात मुक्त आविष्कार असतो; मात्र, त्यामागं एक सूत्र असतं. या दोन्ही संगीत संस्कृतींचा गाभा आत्मसात करूनच उत्तम फ्युजन निर्माण होऊ शकतं. नुसतं वेगवेगळ्या शैलीतल्या वाद्यसंगीताची ठिगळं जोडणं म्हणजे फ्युजन (संगम) नसून कन्फ्युजन (गोंधळ) आहे. मी दररोज नवं काही करू पाहतो. अजूनही शिकतो आहे, असंच वाटतं. संगीतमय होऊन नवं सर्जन हीच माझ्यासाठी प्रार्थना असते. तोच अपरिमित आनंद. त्याशिवाय माझं अस्तित्वच नाही. पं. भीमसेन जोशी यांनी भैरवीच्या सुरावटीत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चा पाया पक्का केला. मी त्याचं फ्युजन भारतातील विविधतेशी करत गेलो. ‘बजे सरगम हर तरफ से’ या देश राग शीर्षकाच्या ध्वनिफितीबाबतही हेच तत्त्व अनुसरलं. प्रयोगशीलतेद्वारा मिलाफ साधण्याचं काम मी माझ्या बॅण्डमार्फत करतो. त्यातलं समाधान मला चिरतरुण ठेवतं. संगीत क्षेत्रात भिन्न संस्कृतींनी परस्परांना समजून घेत वाटचाल करता करत एकरूप होणं, या ध्यासानं मी झपाटला गेलो आहे.
- नीला शर्मा

Web Title: pune news vasantotsav