‘वसंतोत्सव’ आजपासून रंगणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

पुणे - आजपासून (शुक्रवार) सुरू होत असलेल्या ‘वसंतोत्सवा’त शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन, प्राचीन संगीत नाटकांच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडविणारे ‘संगीत सौभद्र’, प्रख्यात तबलावादक पं. कुमार बोस आणि अनिंदो चटर्जी यांची तबला जुगलबंदी, लुई बॅंक्‍स-निर्वाणा यांच्या बॅंडचे फ्यूजन आणि तरुणाईचा आवडता सतारवादक नीलाद्री कुमार यांचे वैशिष्ट्यपूर्ण सतारवादन होत आहे. न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमध्ये हा महोत्सव होत आहे.

ख्यातनाम गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त ‘सकाळ’ प्रस्तुत करत असलेल्या या स्वरयात्रेसाठी ‘मराठे ज्वेलर्स’ टायटल स्पॉन्सर आहेत. पॉवर्ड बाय ‘रावेतकर ग्रुप’ या उत्सवासाठी ‘हॅशटॅग’ आणि ‘महामेट्रो’ सहप्रायोजक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. बॅंकिंग पार्टनर, ९१.१ एफएम रेडिओ सिटी रेडिओ पार्टनर, महेफिल केटरिंग सर्व्हिसेस, जनसेवा भोजनालय फूड पार्टनर, गिरिकंद हॉलिडेज ट्रॅव्हल पार्टनर, १०० टक्के पब्लिक रिलेशन्स पीआर पार्टनर, सेतू ॲडव्हर्टायझिंग कम्युनिकेशन पार्टनर आणि व्हाइट कॉपर प्रा. लि. एक्‍झिक्‍युटिंग पार्टनर आहेत.

वसंतोत्सवासारख्या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व घेतल्यावर कार्यक्रम किती लोकप्रिय आहे याचा अंदाज आम्हाला आला. आम्ही वसंतोत्सवाचे प्रायोजक आहोत हे ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले तेव्हापासून सगळ्या मित्रपरिवाराची, पुणेकरांची विचारणा आमच्याकडे वाढली आहे. ‘हॅशटॅग’ला मध्यमवयीन लोकच भेट द्यायचे. पण, वसंतोत्सवाचे प्रायोजकत्व घेतल्यापासून ज्येष्ठ नागरिकांचीदेखील वर्दळ वाढली आहे. ‘वसंतोत्सवा’सारख्या प्रतिष्ठित व रसिकप्रिय कार्यक्रमासाठी व ‘सकाळ’सारख्या लोकप्रिय मीडिया ब्रॅंडबरोबर काम करण्याचा आम्हाला फायदा होतोय, असेच म्हणता येईल. 
- निवेदिता व अमोल नहार, हॅशटॅग

पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना इथे प्रोत्साहन मिळते. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना कायम प्रोत्साहन देत आली आहे. ‘वसंतोत्सवा’सारख्या नावाजलेल्या कार्यक्रमात भारतातील विविध घराण्यांचे लोक आपली कला सादर करतात, या सगळ्या लोकांच्या कलेचा आस्वाद पुणेकरांना घेता येतो. ‘वसंतोत्सवा’शी आम्ही पहिल्यांदाच जोडले जात आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिक पुणेकरांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला. आमच्या सगळ्या शाखांमध्ये प्रवेशिका घेण्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने लोक आले. तुम्ही चांगले कार्यक्रम करता, अशी त्या सगळ्यांची प्रतिक्रिया होती.
- सुशील जाधव, झोनल मॅनेजर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.

Web Title: pune news vasantotsav