पुण्यात होणार "शोध मराठी मनाचा' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

पुणे - जगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांना एकत्र आणणारे जागतिक मराठी अकादमीचे आगामी "शोध मराठी मनाचा' हे जागतिक संमेलन पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ऑस्ट्रेलियातील उद्योजक डॉ. विजय जोशी; तर स्वागताध्यक्षपदी "बीव्हीजी ग्रुप'चे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. 

पुण्यात 1 ते 3 जानेवारी 2018 दरम्यान हे संमेलन होणार आहे. याचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून, या वेळी माजी कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष, वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि संमेलनाचे संयोजक सचिन ईटकर यांनी मंगळवारी दिली. 

डॉ. जोशी यांनी निर्माण केलेले रस्तेविकासाचे तंत्रज्ञान जगभरात मोलाचे मानले जाते. त्यांच्या कार्याबद्दल ऑस्ट्रेलियातील सरकारने त्यांचा "ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला आहे. असाच ठसा गायकवाड यांनीही उमटवला आहे. "बीव्हीजी ग्रुप'च्या माध्यमातून त्यांनी 70 हजार जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. लोकांना प्रेरणा मिळणे आणि जगभरात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मराठी बांधवांनी संमेलनात एकत्र येणे महत्त्वाचे आहे. यंदाच्या संमेलनाचे 15 वे वर्ष असून, विविध देशांतील रसिक संमेलनाला येतील, असा विश्‍वासही फुटाणे यांनी व्यक्त केला. 

Web Title: pune news vijay joshi marathi sammelan