वाढदिवसाची सायकल खेळताना विराटचा अंत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

पुणे - विराटचा चार जूनला वाढदिवस झाला होता. वडिलांनी आठ दिवसांपूर्वीच लाडक्‍या विराटला छोटीशी छान सायकल घेऊन दिली. याच सायकलवर विराट आपल्या चुलत भावाबरोबर संगमवाडी येथील आपल्या घराजवळील नदीच्या किनाऱ्याला खेळत होता. नेमके त्याचवेळी नदीचे पाणी हळूहळू वाढत होते. दोघे खेळताना विराटची सायकल अचानक उतारावरून वेगाने नदीच्या दिशेने गेली. सायकल उलटली आणि विराट नदीच्या प्रवाहात वाहत गेला. तीन दिवसांच्या शोधानंतर हसत्या-खेळत्या विराटचा मृतदेह कल्याणीनगर येथे आढळला. ती बातमी ऐकताचक्षणी त्याच्या आई-बाबांनी टाहो फोडला! 

पूर्वी शेती व मासेमारीवर गुजराण करणारे काची कुटुंबीय कित्येक पिढ्या संगमवाडी पुलाजवळ नदीच्या कुशीत गुण्यागोविंदाने राहात आहेत. आत्तापर्यंत कधीच अशी अनुचित घटना घडली नाही. पण बुधवारच्या दुपारी मात्र विपरीत घटना घडली. याच नदीच्या अंगाखांद्यावर खेळत मोठे झालेल्या प्रसाद काची यांचा पाच वर्षांचा विराट, त्याचा चुलत भाऊ सूरजबरोबर खेळत होता. विराज व सूरज नदीकिनाऱ्याच्या हिरव्यागार गवतावर खेळत होते. विराट सायकलवर बसला असताना उतारावरून त्याची सायकल वेगात नदीच्या दिशेने गेली. सायकलवर बसलेला विराट तितक्‍याच वेगाने नदीच्या पाण्यात फेकला गेला. ही घटना डोळ्यांसमोर पाहणारा सूरज विराटची वाट पाहत होता; पण विराट काही येईना. दहा मिनिटांनंतर त्याने घरी धाव घेत घडलेला प्रसंग सांगितला. 

या घटनेनंतर अग्निशामक दल, पोलिस, प्रसाद काची यांचे चुलत भाऊ अंकुश काची, कुटुंबीय व मित्रांनी विराटचा शोध घेण्यास सुरवात केली. दोन दिवस उलटूनही विराट काही सापडला नाही. या घटनेने अंतर्बाह्य हेलावलेले त्याचे आई-बाबा, आजी-आजोबा, काका या सगळ्यांचेच डोळे विराटला पाहण्यासाठी आतुर झाले होते. अखेर शुक्रवारची सकाळ उजाडली, तीच विराटचा सांगावा घेऊन. कल्याणीनगर येथील नदीपात्राजवळ छोट्या मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती जीवरक्षक राजेंद्र काची यांना मिळाली. त्यानंतर विराटच्या आई-बाबासह संपूर्ण काची कुटुंबांच्या अश्रूंचा बांध फुटला. 

विश्रांतवाडीच्या स्टेप अप किड्‌स शाळेत नर्सरीत शिकणारा विराट सगळ्यांचाच आवडता होता. घरीही सगळे कुटुंबीय त्याचे लाड करत. त्याचा सहा महिन्यांचा छोटा भाऊ वरदबरोबर खेळणारा, सगळ्यांची मने जिंकणारा गोड विराट आता पुन्हा दिसणार नाही, हे वास्तव स्वीकारणे त्याच्या आई-बाबांना अक्षरशः कठीण झाले होते. 

Web Title: pune news Virat drown in river