प्रशासकीय नव्हे; परराष्ट्र सेवेत जाणार: विश्‍वांजली गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत पुण्यातील विश्‍वांजली गायकवाड ही देशात अकरावी आणि राज्यात प्रथम आली आहे. तिने भारतीय प्रशासकीय नव्हे; तर परराष्ट्र सेवेत जाण्याचा निश्‍चय तिने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.

पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत पुण्यातील विश्‍वांजली गायकवाड ही देशात अकरावी आणि राज्यात प्रथम आली आहे. तिने भारतीय प्रशासकीय नव्हे; तर परराष्ट्र सेवेत जाण्याचा निश्‍चय तिने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्य परीक्षा झाली होती. एप्रिल महिन्यात मुलाखती झाल्या होत्या. त्याचा आज अंतिम निकाल जाहीर झाला आहे. पहिल्या शंभर जणांत राज्यातील केवळ तिघे दिसून येत आहेत. एकूण पात्र ठरलेल्यांमध्ये राज्यातील सुमारे ऐंशी उमेदवार आहेत. स्वप्नील खरे 43 व्या स्थानावर, स्वप्नील पाटील 55, भाग्यश्री विसपुते 103, प्रांजल पाटील 124, सूरज जाधव 151, स्नेहल लोखंडे 184, अनुज तारे 189 आणि अंकिता ठाकरे 211 व्या स्थानावर आहेत.

विश्‍वाजली हिने पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी मिळविली आहे. त्यापूर्वी पंडितराव आगाशे विद्यालयात तिने दहावी आणि मराठवाडा मित्रमंडळ कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. या काळात तिने कोणताही खासगी क्‍लास लावला नसल्याचे तिची आई ज्योती अभिमानाने सांगतात. तिचे वडील डॉ. एम. आर. गायकवाड आणि आई ज्योती गायकवाड हे दोघे याच महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.

विश्‍वांजलीने यशाबद्दल आनंद व्यक्त केला; पण नागरी सेवेतील आव्हाने स्वीकारायचे असल्याचे तिने सांगितले. "सकाळ'शी बोलताना ती म्हणाली, 'परीक्षा ही केवळ पात्र ठरण्याचे माध्यम आहे; परंतु सेवेत गेल्यानंतर काय करता येईल, याचा विचार केला पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी, मराठी या भाषेचा कुठेही अडसर नसतो. तुमचे मौखिक आणि लिहिण्यातून संवादाचे कौशल्य मात्र तुमच्याकडे हवेत.''

विद्यार्थ्यांना लाभ
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पात्र होणाऱ्यांमध्ये मराठी टक्का वाढावा यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उमेदवारांना दिल्लीमध्ये सात दिवस प्रशिक्षण आणि त्यांचा मुलाखतीची चाचणी असा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो सुरू असून, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो आहे. या वेळी त्यात 135 जण सहभागी झाले. त्यातील 48 जण पात्र ठरले आहेत.

"महाराष्ट्राचा टक्का कमीच'
युनिक ऍकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव आणि मल्हार पाटील म्हणाले, 'निकालात महाराष्ट्रातील टक्का कमी झाला आहे. मुलींची संख्या मात्र वाढली आहे. पात्र उमेदवारांच्या यादीत युनिक ऍकॅडमीचे 40 विद्यार्थी आहेत. पात्र झालेल्यांमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. पूर्वी मुलाखत दिलेल्यांपैकी बहुतांश विद्यार्थी पात्र ठरत होते. ते प्रमाण कमी झाले आहे. मुलाखतीवेळी उमेदवाराची विषयाची समज, सामाजिक भान पाहिले जाते. त्याविषयी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जागृती कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुलाखत देण्याचे कौशल्य मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत.''

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
जनावरे खरेदी-विक्रीच्या निर्णयात हस्तक्षेप नाही- केरळ उच्च न्यायालय​
प्रशासकीय नव्हे; परराष्ट्र सेवेत जाणार​
करिअरसाठी स्काय इज द लिमिट​
मराठवाड्यात दीडशे दिवसांत 361 शेतकरी आत्महत्या​
मंत्री झालो याची शेट्टींना असुया..! - सदाभाऊ खोत​
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला

Web Title: pune news vishwanjali gaikwad upsc exam topper in maharashtra