उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

हिंदुस्थानी संगीतातील अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धृपद गायकीला समृद्ध करण्यात  डागर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. डागर घराण्याच्या मागील १९ पिढयांकडून हा समृद्ध वारसा उस्ताद सईदुद्दीन यांच्याकडे आला होता.

पुणे : धृपद गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणारे ख्यातनाम गायक उस्ताद सईदुद्दीन डागर (वय 78) यांचे अल्पशा आजारपणामुळे पुण्यात एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता 31) जयपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हिंदुस्थानी संगीतातील अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धृपद गायकीला समृद्ध करण्यात  डागर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. डागर घराण्याच्या मागील १९ पिढयांकडून हा समृद्ध वारसा उस्ताद सईदुद्दीन यांच्याकडे आला होता. ते धृपद-धमार गायला बसले की, मैफल रंगून जात असे, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. देश-विदेशात त्यांच्या अनेक मैफली झाल्या आहेत. अनेक शिष्यांनाही त्यांनी घडवले आहे. धृपद गायनशैलीतील बारकावे समजून सांगण्याचे खास कौशल्य त्यांच्याकडे होते.

त्यांच्या मागे पत्नी रिहाना, पुत्र उस्ताद नफिसुद्दीन डागर आणि उस्ताद अनिसुद्दीन डागर असा परिवार आहे. 

Web Title: Pune news Vocalist Ustad Sayeeduddin Dagar passes away