बनावट मतदार नोंदणी प्रकरणी कारवाईचे आश्वासन

कागदपत्रांची तपासणी न करताच बनावट नावे मतदार यादीत
कागदपत्रांची तपासणी न करताच बनावट नावे मतदार यादीत

वाघोली (पुणे): वाघोलीतील 3400 बनावट मतदार नोंदणी प्रकरणी चौकशी करुन दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करणार असल्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सांगितल्याची माहिती आमदार बाबुराव पाचर्णे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. यामुळे आजपासून (सोमवार) करण्यात येणारे उपोषण स्थगीत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिरुर-हवेली विधानसभेच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीत वाघोलीतील 3400 बनावट मतदारांची नोंद करण्यात आली. त्या अर्जाची कोणतीही तपासणी न करता ही नोंद करण्यात आली असून, त्यासोबत बनावट कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. हा प्रकार माजी जिल्हा परीषद सदस्य रामदास दाभाडे यांनी उघडकीस आणल्यानंतर आमदार बाबुराव पाचर्णे यांनी या प्रकारणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची तसेच नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी लेखी पत्राव्दारे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे केली हेाती.

आजपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमेार उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला हेाता. दरम्यान, विभागीय आयुक्त दळवी व आमदार पाचर्णे यांच्यामध्ये भेटीअंती चर्चा झाली. चौकशी व कारवाईचे आश्वासन दळवी यांनी दिल्याने उपेाषणाचा निर्णय स्थगीत करण्यात आला. या प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी सैारभ राव यांच्या सोबत बैठक घेउन चर्चा केली जाणार आहे. तसे आदेशही दळवी यांनी राव यांना दिल्याचे पाचर्णे यांनी सांगितले. ही बैठक उद्या (मंगळवार) होण्याची शक्यता आहे, असेही त्यानी स्पष्ट केले.

संबंधित बातमीः

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com