बालसुधारगृहातून धुम ठोकल्यानंतर गावात केल्या जबरी चोऱया

निलेश कांकरिया
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

वाघेालीः गावात राहूनच गावात जबरी चेारीचे गुन्हे करणाऱया 19 वर्षीय तरुणाला लेाणीकंद पोलिसांनी जेरबंद केले. त्याने गावात सहा चोऱया केल्या हेात्या. त्याच्याकडील मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. त्याने अल्पवयीन असतानाही चेारीचे गुन्हे केले हेाते. त्यावेळी त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले हेाते. मात्र, तेथूनही त्याने धूम ठोकली हेाती.

सैारभ गेापाळ कुमारअली (वय 19, रा. मांजरीखुर्द, ता. हवेली, जि. पुणे) असे जेरबंद केलेल्या तरुणाचे नाव आहे. 19 ऑक्टेाबर रोजी त्याने गावातील दयानंद सुरवसे यांच्याकडून मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चेारुन नेला हेाता. याबाबत लेाणीकंद पोलीसात गुन्हा दाखल झाला हेाता. यानंतर पोलिसांनी गतीने तपास केला. हा प्रकार गावातील तरुणानेच केल्याचे पोलीसाना समजल्यानंतर त्यानी त्याचा शेाध सुरु केला. मात्र, तो सापडत नव्हता. अखेर पोलिसांनी मांजरी गावात सापळा रचून व वेशांतर करुन सौरभला जेरबंद केले.

सौरभकडे अधिक चैाकशी केली असता. त्याने गावातच सहा चोऱया केल्याचे उघडकीस आले. विविध ठिकाणी घरफेाडी करुन त्याने रोख पाच हजार, नऊ हजार रुपायांचे पितळाचे भांडी, किंमती मोबाईल, एक दुचाकी व शाळेतील गॅस सिलेंडर चोरले होते. किंमती मोबाईल वगळता पोलिसांनी अन्य माल हस्तगत केला. तो गावातच सलूनचे दुकान चालवत होता. गावातील व्यक्तीच चोरी करीत असल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थही अवाक झाले. त्याला जेरबंद करण्यात आल्याने ग्रामस्थानी सुस्कारा सेाडला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 27 पर्यंत पोलीस केाठडी सुनाविली.

ग्रामीण पोलिस अधिक्षक सुवेज हक, उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरुड, पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस कर्मचारी बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, समीर पिलाने, हनुमंत पडळकर, सागर केांढाळकर, विनेाद वाडकर सहाय्यक फैाजदार उत्तम साळुंके यांनी ही कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीबद्ल पोलिस अधिक्षकानी पाच हजार रुपायांचे बक्षीस जाहीर केले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news wagholi theft arrested