वाघोलीत तब्बल चार तास वाहतूक कोंडी...

निलेश कांकरिया
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

वाघोली (पुणे): पुणे-नगर महामार्गावर आज (बुधवार) सकाळी चार तास वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली होती. नगरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे नेाकरदार, विद्यार्थी यांचे प्रचंड हाल झाले. वाहनातून उतरुन पायी चालत विद्यार्थ्यांनी शाळा तर काही नेाकरदारांनी आपले कार्यालय गाठले. चौकाचौकात झालेली बेशिस्त वाहतूक, वाहतूक पोलिस कर्मचारी व वॅार्डन यांची कमी संख्या व पावसामुळे महामार्गालगत साचलेले पाणी हेच या वाहतूककोंडीचे कारण आहे.

वाघोलीतील सेायरीक मंगल कार्यालया पासून वाहतूककोंडीस सुरवात झाली. नगरकडे जाणारी वाहतूक सुरवातीला कासव गतीने सुरु होती. तर पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ सुरळीत सुरु होती. जशीजशी वाहनांची संख्या वाढू लागली तशी कोंडीत अधिकच भर पडली. यानंतर नगरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या मार्गावर काही किलोमीटर पर्यंत रांग लागली होती. 15 ते 20 मिनीटानंतर वाहन जाग्यावरुन हालत होते. या कोंडीतून दुचाकीधारकानाही मार्ग काढता आला नाही. शाळेत, कॉलेजला तसेच कार्यालयात जाण्यासाठी उशीर हेाऊ लागल्याने विद्यार्थी व काही नेाकरदारानी वाहनातून उतरुन चालतच कॉलेज व ऑफीस गाठण्यास सुरुवात केली.

पुण्याकडे जाणारी वाहतूक काही प्रमाणात सुरळीत असल्याने अनेक वाहनचालकांनी नगरच्या दिशेने जाण्यासाठी उलटया दिशेने वाहतूक केली. काही काळानंतर पुण्याकडे जाणाऱया दिशेनेही वाहतूककोंडी झाली. या कोंडीने सर्व जण त्रस्त झाले होते. वाघेश्वर चैाकात एकच वॉर्डन वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत होता. मात्र, त्याचे वाहनचालक ऐकत ऩसल्याने बेशिस्त वाहतूक हेात होती. यामुळे कोंडीत अधिकच भर पडत होती. 11.30 नंतर वाहने हलण्यास सुरुवात झाली. ही कोंडी काढण्यासाठी लोणीकंदचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनाही रस्त्यावर उतरावे लागले. अखेर दुपारी बारानंतर कोंडीतून काहीसा दिलासा मिळाला. यानंतर दिवसभर अधून-मधून कोंडीचा खेळ सुरुच हेाता. या कोंडीबाबत नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

रुग्णवाहीकेचा सायरन
या कोंडीत काही रुग्णवाहीकाही अडकुन पडल्या हेात्या. त्यातून मार्ग मिळावा यासाठी त्यांचा सायरन वाजत हेाता. मात्र, नगरकडे जाणारी वाहतूकच ठप्प झाल्याने त्यांनाही कसरत करुनच मार्ग काढावा लागला.

केवळ बैठका कार्यवाही नाही
वाहतूककोंडी सेाडविण्यासाठी सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थीतीत अऩेक वेळा बैठका झाल्या आहेत. त्यात ठरलेल्या तात्पुरत्या उपाययेाजना केवळ कागदोपत्रीच आहेत. यामुळे सध्या दररेाजच वाहतूककोंडीला समेारे जावे लागते. मात्र,बुधवारच्या कोंडीने खूपच हाल झाले.

Web Title: pune news Wagholite traffic stops for four hours ...