दोन गटांतील वादातून वीस वाहनांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

वारजे माळवाडी - रामनगरमध्ये व बापूजी बुवा चौकात चोवीस तासांत सुमारे १८ ते २० वाहने तोडफोडीच्या दोन घटना घडल्या. दोन गटांतील अंतर्गत वादातून हा प्रकार घडला.

वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी परस्पर विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. रामनगरमध्ये रविवारी रात्री घडलेल्या वाहनांच्या तोडफोडप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. तसेच या घटनेत तीन-चार अल्पवयीन मुलांनाही सहभाग आहे. बापूजी बुवा चौकात सोमवारी घडलेल्या घटनेतदेखील अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, असे पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांनी सांगितले. 

संक्रांतीच्या दिवशी गुंजाळ वस्ती व रामनगरमधील काही मुलांची भांडणे झाली. त्यानंतर रामनगरमधील सात आठ जणांचे टोळके गुंजाळ वस्तीत गेले. त्यांनी परत जाताना पाच-सहा वाहनांच्या काचा फोडल्या. यात रुग्णवाहिका, सहाआसनी रिक्षा, कार व दोन दुचाकींचा समावेश आहे. त्यानंतर तोडफोड करणारे फरार झाले. त्यानंतर सोमवारी गुंजाळ वस्तीतील काही मुलांनी सोमवारी संध्याकाळी रामनगरमधील १४ गाड्यांची तोडफोड केली. यात रिक्षा, टेंपो, जीप व दुचाकींचा समावेश आहे.

Web Title: pune news warje malwadi ramnagar crime vehicles