जुनी सांगवी मुख्य बस स्थानकात पाणपोईची व्यवस्था

रमेश मोरे
बुधवार, 14 मार्च 2018

सध्या दमट हवामानाबरोबरच उन्हाच्या झळा वाढल्या असून  बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरीक प्रवाशांची तारांबळ व्हायची. येथील संतोष कांबळे, राकेश कांबळे यांच्या प्रयत्नातून येथे पाणपोई उभारण्यात आली असून बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील वसंतदादा पुतळा मुख्य बसथांब्यावर स्थानिक नागरीकांच्या वतीने पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे.

सध्या दमट हवामानाबरोबरच उन्हाच्या झळा वाढल्या असून  बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरीक प्रवाशांची तारांबळ व्हायची. येथील संतोष कांबळे, राकेश कांबळे यांच्या प्रयत्नातून येथे पाणपोई उभारण्यात आली असून बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.बुधवार ता.१३ स्थानिक नगरसेवक हर्षल ढोरे यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी परिसरातील रामभाऊ देशपांडे, प्रकाश दिवार, आप्पा कांबळे, राकेश कांबळे, देवराम माकर, विलास वाघ,मुरली देवरे,बाळू कांबळे, शिवलिंग सरोदे,मुकुंद शिनगारी, गणेश गायकवाड,असलम शेख आदी उपस्थित होते.

Web Title: pune news: water development