समान व शुद्ध पाणीपुरवठा योजनेला आयुक्तांचे प्राधान्य 

समान व शुद्ध पाणीपुरवठा योजनेला आयुक्तांचे प्राधान्य 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पुणे - पुणेकरांना समान व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आखलेल्या योजनेतील कामांना महापालिका आयुक्तांचे प्राधान्य राहिले आहे. तसेच, पर्वती ते लष्कर जलवाहिनी, भामा आसखेड प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यात येणार असून, पर्वती येथील पाचशे दशलक्ष लिटर (प्रतिदिन) क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन आयुक्तांचे आहे. 

समान पाणीपुरवठा योजना राबवितानाच, पाणीपुरवठ्यासाठी गेल्या काही वर्षांत आखलेल्या जुन्या योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यानुसार या कामांसाठी भांडवली आणि महसुली अशी सुमारे 904 कोटी 58 लाख रुपयांची तरतूद त्यांनी केली असून, त्यात, बंद नलिकेतून पाणी वाहून नेण्यासाठी पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते लष्कर जलकेंद्रापर्यंतच्या 2200 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे काम येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आयुक्तांनी म्हटले आहे. तसेच, पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या भामा आसखेड योजनेचे काम खोळंबले असून, तेही येत्या डिसेंबरमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत साठवण टाक्‍या बांधणे, जलवाहिन्या टाकणे, मीटर बसविण्याच्या कामाला सुरवात करण्यात येईल. ज्यामुळे या योजनेला गती मिळणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. 

Web Title: pune news water PMC