समान पाणीपुरवठ्याची निविदा चौकशी करून रद्द करा - काकडे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 डिसेंबर 2017

पुणे - समान पाणीपुरवठा योजनेवरून खासदार संजय काकडे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. योजनेच्या फेरनिविदाही संशयास्पद असून, त्यानुसार कार्यवाही झाल्यास पुणेकरांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या निविदेची चौकशी करून ती रद्द करावी, अशी मागणी काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली. 

या योजनेच्या निविदा प्रक्रियांवर काकडे यांनी सुरवातीपासून आक्षेप घेतले आहेत; परंतु कुणाल कुमार यांच्याशी दोनदा पत्रव्यवहार करूनही ते खुलासा करीत नसल्याचे काकडे यांचे म्हणणे आहे. 

योजनेच्या फेरनिविदेतही त्रुटी आहेत. त्यामुळे पुणेकरांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असून, महापालिकेला नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. याआधीच्या निविदेत त्रुटी असल्यानेच ती रद्द केली होती. त्यानंतर काढलेल्या निविदेतही तशाच त्रुटी आहेत. योजनेच्या सल्लागाराने चुकीच्या पद्धतीने ही निविदा काढली आहे. निविदेत प्रस्तावित दर आणि बाजारातील दरात तफावत आहे. त्यामुळे पुणेकरांचे आर्थिक नुकसान होणार आहे. मीटरच्या दरात फरक आहे. योजनेचे "एस्टिेमेट' आणि बाजारातील साहित्याच्या किमतीतही फरक आहे. त्यामुळे या निविदेनुसार योजना राबविल्यास नुकसान होणार आहे. त्यामुळे ती रद्द करावी, असेही काकडे यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, काकडे केंद्रीय गुन्हे अन्वेषण आणि महालेखापालांकडे (कॅग) पत्र दिले आहे.

Web Title: pune news water sanjay kakade tender