शहरात उद्या पाणीपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

पुणे - महापालिकेच्या विविध जलकेंद्रांमधील देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (ता. ८) संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी (ता. ९) कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर जलकेंद्रात ही कामे होणार आहेत. पाणीपुरवठा बंदच्या काळात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे. 

पाणीपुरवठा बंद राहणारी जलकेंद्रे पुढीलप्रमाणे : पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग), चतुःशृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग.

Web Title: pune news water supply close

टॅग्स