करवाढीचा प्रस्ताव दुरुस्तीसाठी मागे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

पुणे - पाणीपट्टी तसेच मिळकतकरात 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दुरुस्तीचे कारण सांगत गुरुवारी परत घेतला. प्रस्तावात काही सुधारणा केल्यावर तो पुन्हा मांडण्यात येणार असल्याचे समजते. 

पुणे - पाणीपट्टी तसेच मिळकतकरात 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दुरुस्तीचे कारण सांगत गुरुवारी परत घेतला. प्रस्तावात काही सुधारणा केल्यावर तो पुन्हा मांडण्यात येणार असल्याचे समजते. 

पाणीपट्टीत 2021 पर्यंत दरवर्षी 12 टक्के वाढ करण्याचा निर्णय या पूर्वीच झाला आहे, तर मिळकतकरात 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी त्यावर निर्णय होणार होता. परंतु, प्रस्तावात सुधारणा करायच्या आहेत, असे सांगत प्रशासनाने तो मागे घेतला. दुरुस्ती झाल्यावर पुन्हा प्रस्ताव मांडण्यात येईल. पाणीपट्टीतील वाढ वगळता मिळकतकरातील वाढीला विरोध करण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. समाविष्ट गावांमधील सुमारे दीड लाख मिळकतींद्वारे आता वाढीव उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे सध्या तरी मिळकतकरात वाढ करू नये, असे त्यांचे म्हणणे आहे. तर, विविध कारणांमुळे महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. बांधकाम क्षेत्रातील मंदीचाही जबर फटका महापालिकेला बसला आहे. त्यामुळे विकासकामे करायची असतील तर, मिळकतकरात वाढ करावी लागेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

Web Title: pune news water tax PMC