पावसाच्या तुरळक सरी कोसळणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

पुणे - पुण्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या ऐतिहासिक गणेशोत्सवावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पुढील सहा दिवस शहरात पावसाच्या तुरळक सरी हजेरी लावतील, असेही हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. 

शहरात गणरायाचे आगमन होत असताना सकाळपासून पावसाच्या सरींनी हजेरी लावली. दिवसभर पावसाच्या हलक्‍यी सरी पडत होत्या. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात दोन मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर लोहगाव येथे सात मिलिमीटर पाऊस पडला. 

मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुणे शहर आणि परिसरात पाऊस पडत आहे. पुढील सहा दिवस पावसाच्या काही सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. 

शहरात एक जूनपासून आतापर्यंत 505.7 मिलिमीटर पाऊस पडला आहे. लोहगाव येथे 537 आणि पाषाण येथे 509 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

Web Title: pune news weather rain