गडगडाटांसह पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

पुणे - शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने सोमवारी वर्तविली. शहरात दिवसभरात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे कमाल तापमानाच्या पाऱ्याने ३२.१ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली. सरासरीपेक्षा ३.६ अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले आहे, असेही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. शहरात १ जूनपासून ५९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र ते कर्नाटक यादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून हा पट्टा कर्नाटककडून मध्य महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत (ता. १४) कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे.

कोकण, गोव्यात काही ठिकाणी मंगळवारी (ता. १२) मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी; तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी; तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाचा अंदाज आहे.

Web Title: pune news weather rain