मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पुणे - कोकण-गोव्यात काही ठिकाणी सोमवारी (ता.18) आणि मंगळवारी (ता. 19) जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, तर मध्य-महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. 

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या बुधवारी (ता. 20) कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य-महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस, पडण्याची शक्‍यता आहे. तसेच, येत्या दोन दिवसांत पुण्यात पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यता आहे. सौराष्ट्र, कच्छ यांसह कर्नाटक आणि केरळ किनारपट्टी परिसरात मॉन्सूनने जोर धरला आहे. तर पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेश किनारपट्टी, तमिळनाडू, अंदमान आणि निकोबार येथे मॉन्सून सक्रिय झाला आहे. 

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरात चक्राकार वाऱ्याची निर्मिती झाली असून, येथून समुद्रसपाटीपासून 2.1 किलोमीटर आणि 4.5 किलोमीटर उंचीवरून वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असून, या परिसरातून समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचावरून वारे वाहत आहेत, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

Web Title: pune news weather rain