बदलत्या वातावरणात सर्पदंशापासून सावधान!

शिवाजी आतकरी 
सोमवार, 5 जून 2017

पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दरवर्षी साधारण आठ ते दहा हजार साप पकडले जातात. यातील बहुतेक बिनविषारी असतात. सर्पदंशाचे प्रमाण शहरात नगण्य असले तरी बदलत्या वातावरणात सापांच्या स्वभावात होणाऱ्या बदलामुळे सर्पदंशापासून सावध राहण्याची गरज आहे. 

पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दरवर्षी साधारण आठ ते दहा हजार साप पकडले जातात. यातील बहुतेक बिनविषारी असतात. सर्पदंशाचे प्रमाण शहरात नगण्य असले तरी बदलत्या वातावरणात सापांच्या स्वभावात होणाऱ्या बदलामुळे सर्पदंशापासून सावध राहण्याची गरज आहे. 

कडक उन्हाळ्यात तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. सापांना पंधरा ते तीस अंश सेल्सिअस तापमान सहन होते. तापमान प्रचंड वाढल्याने थंड रक्त वर्गातील हा प्राणी स्वतःच्या शरीराचे तापमान संतुलन करण्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी तो दिवसा रस्त्यावर मोकळ्या जागेवर अथवा आपल्या जवळ फिरकतो. गंध व तापमानाचे ज्ञान प्रचंड असल्याने साप त्यास योग्य वातावरण शोधतो. काही साप निशाचर व शिकारीसाठी रात्री बाहेर पडतात. एकूणच बदलते वातावरण, सापांना असह्य झालेला उकाडा, त्यांचा चिडचिडा स्वभाव यातून उघड्यावर येणाऱ्या सापांमुळे सर्पदंश होण्याची शक्‍यता वाढते. दरवर्षी पिंपरी चिंचवड व पुणे  परिसरात आठ ते दहा हजार साप पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले जातात. यातील बहुतांश बिनविषारी असतात, असे बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानचे अभिरक्षक दीपक सावंत यांनी सांगितले. 

१५ ते ३० डिग्री तापमान सापांना सुसह्य होते. त्यापेक्षा कमी वा अधिक तापमानात त्यांचा स्वभाव चिडचिडा व आक्रमक होतो. अशा वेळी त्याच्या वाटेला गेले तर सर्पदंश होण्याचा संभव असतो. साप पकडून दुसरीकडे सोडला किंवा मारला तर दुसरे साप त्या परिसरात येतात हे अन्नसाखळीच्या नैसर्गिक नियमानुसार आहे. साप परिसरात फिरकणार नाही, यासाठी साप व बेडूक त्या परिसरात होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
- दीपक सावंत (अभिरक्षक, बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान)

साप हा ‘कोल्ड ब्लड’ प्राणी आहे. स्वतःच्या शरीराचे तापमान संतुलित करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. त्यामुळे गारवा धरून साप राहतात. कडक उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी रस्त्यावर साप दिसतात त्यास हेच कारण आहे. कडाक्‍याची थंडी आणि कडाक्‍याचे तापमान दोन्हीही सापांना सहन होत नाही. त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी तो प्रयत्नशील राहतो.
- अभिजित पाटील (सर्पमित्र)

सर्पमित्र आणि त्यांचे मोबाईल क्रमांक 
अभिजित पाटील, निगडी, आकुर्डी रावेत  ः ७०३०७०४७६०. अभिजित पवार, चिखली रोड, आकुर्डी ः ९५२७०९९०५६. विशाल खोले, चिखली : ९८५०९९३६८८. योगेश कनजावणे, पिंपरी : ९५२७९८७०२८. राजेश कांबळे, ताथवडे : ९७६७४५६७०९. हरी रेड्डी : ९७६५१३५६६९.

Web Title: pune news weather Snake