वजनकाट्यांच्या तपासणीची 'डेडलाइन' हुकणार?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

पुणे - राज्यात गाळप हंगाम सुरू असलेल्या 176 साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी 31 डिसेंबरपर्यंत करण्याचे आदेश राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. मात्र यासाठी आतापर्यंत केवळ नऊ जिल्ह्यांतच भरारी पथकाची स्थापना केली आहे. त्यामुळे ठरलेल्या मुदतीमध्ये सर्व कारखान्यांची तपासणी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वजनकाट्यामध्ये तफावत करून शेतकऱ्यांच्या उसाचे वजन करताना "मापात पाप' केली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून सातत्याने होते. त्यासाठी यंदाच्या हंगामातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची अचानक तपासणी करण्यासाठी "भरारी पथके' नेमण्याचे आदेश सहकारमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार आठ ते दहा कारखान्यांसाठी "एक भरारी पथक' स्थापन करण्याचे पत्र साखर आयुक्तालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले होते. मात्र काही जिल्ह्यांमध्ये अद्याप या पथकांची स्थापना करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

शुक्रवारपर्यंत(ता.22) पुणे, सातारा, नगर, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, हिंगोली, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येच या पथकांची स्थापन झाली आहेत. नगर जिल्ह्यातील पथकाने पाच कारखान्यांच्या तपासण्या केल्या असून त्यात एकही वजनकाटा दोषी आढळून आला नाही. कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये या पथकांची अद्यापही स्थापन झाली नाहीत. त्यामुळे 31 डिसेंबरपूर्वी सर्व कारखान्यांच्या तपासण्या होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र सहकारमंत्र्यांनी प्रादेशिक साखर संचालकांना विशेष खबरदारी घेऊन तपासण्या पूर्ण कण्याचे आदेश दिले आहेत.

ऊस वाहतूक खर्चाचा दर अंतरानुसार आकारण्याचा निर्णय ऊसदर नियंत्रण मंडळाने घेतला आहे. सध्या कारखान्यांकडून या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार होत आहे. मात्र या परिपत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार आहे. अंतिम बिलाच्या वेळी कारखान्यांना अंतरानुसार वाहतूक खर्च आकारावा लागणार आहे.
-संभाजी कडू-पाटील, साखर आयुक्त.

Web Title: pune news Weighing cheaking