अडीच लाखांचे अवैध मद्य जप्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

पुणे - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या दुतर्फा पाचशे मीटर अंतरात मद्यविक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल आणि तत्सम आस्थापना बंद आहेत. त्यामुळे अवैध दारूविक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल 2 लाख 37 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून बाणेर येथे हॉटेल ग्रीन लाउंजसमोरील टपरीमध्ये विदेशी मद्यविक्री करताना एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे 4 हजार 445 रुपयांचा 10.44 लिटर विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. तसेच दिघी आणि विश्रांतवाडी हद्दीत गावठी दारूची अवैधरीत्या वाहतूक करताना दोन चारचाकी वाहनांमधून एकूण 66 हजार रुपयांची 700 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली, तर मोशी येथे दोन अवैध गावठी दारू निर्मिती केंद्रांवर छापे घालून तब्बल 4 हजार 500 लिटर रसायन आणि 700 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. या तीन ठिकाणी छाप्यांमध्ये तीन जणांना अटक केली असून जप्त केलेल्या अवैध मद्यसाठ्याची एकूण किंमत 2 लाख 37 हजार 40 रुपये इतकी आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक मोहन वर्दे यांनी दिली. ही कारवाई भरारी पथकातील निरीक्षक रामहरी भिसे, उपनिरीक्षक तानाजी शिंदे, अरविंद टेंभुर्णे आणि कर्मचाऱ्यांनी केली. 

Web Title: pune news Wine seized