पुणे : सेल्फी काढताना महिला सिंहगडावरून पडली

राजेंद्रकृष्ण कापसे 
रविवार, 6 ऑगस्ट 2017

गडावर फरत असताना तानाजी कडा येथे ते उभे होते. कड्या जवळ सुरक्षा म्हणून लोखडी रेलिंग लावले आहेत. तरी देखील ती रेलिंग च्या बाहेर जाऊन फोटो काढत होती. गडावर पावसाच्या सरी सुरू असल्याने तेथील भाग निसरडा झाला होता. ती पाय घसरून खाली पडली. तसा तिचा पती व भाव मदतीसाठी ओरडु लागले. त्यावेळी दोन पर्यटक अजिंक्य व सिद्धार्थ शिंदे यांनी त्यांना धीर दिला. 

पुणे : सिंहगडावर तानाजी कडा येथे शनिवारी रात्री सेल्फी काढताना गरोदर महिला प्रणिता लहू इंगळे (वय 28 , रा. लातूर) ही महिला पाय घसरून 150 फूट खाली पडली. तिला स्थानिक नागरिकांनी बाहेर काढली. सुदैवाने तिला की किरकोळ जखमा झाल्या आहेत. 

ही घटना शनिवारी संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान घडली. ती तिचा पती लहू आत्माराम इंगळे तिचा भाऊ सुरेश दत्तात्रय जगताप यांच्या समवेत गडावर आली होती. दरडी पडत असल्याने घाट रस्ता बंद आहे. म्हणुन हे तिघे त्यांच्या मोटारीने  सिंहगड पायथा आतकरवाडी येथे आले. तेथून पायवाटेने गडावर आले होते. 

गडावर फरत असताना तानाजी कडा येथे ते उभे होते. कड्या जवळ सुरक्षा म्हणून लोखडी रेलिंग लावले आहेत. तरी देखील ती रेलिंग च्या बाहेर जाऊन फोटो काढत होती. गडावर पावसाच्या सरी सुरू असल्याने तेथील भाग निसरडा झाला होता. ती पाय घसरून खाली पडली. तसा तिचा पती व भाव मदतीसाठी ओरडु लागले. त्यावेळी दोन पर्यटक अजिंक्य व सिद्धार्थ शिंदे यांनी त्यांना धीर दिला. 

ही माहिती गडावरील स्थानिक रहिवाशी यांना मिळाली तशी ग्रामपंचायत सदस्य अमोल पढेर, दत्ता चव्हाण, विकास जोरकर, ही धावून गेले. त्यांनी श्रीअमृतेश्वर मेंटच्या अरुंद पायवाटने खाली उतरले. पडलेल्या महिलेच्या आवाजाच्या दिशेने जण्यासाठी त्यांना तीव्र कडावर आडवे जावे लागले. त्यांनी तिला उचलून, धरून वर आणले. वर आल्यावर पती व भावाने तिला मिठी मारून भावना व्यक्त केल्या. प्राथमिक पाहिले असता तिच्या हाता- पायाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. ती महिला गरोदर असल्याने गडावर स्थानिक महिला सीमा पढेर, रुपाली पढेर, अलका बाजड, सुरेखा पढेर, रेखा पढेर या महिला धावून गेल्या. तिला वरून आवाज देऊन धीर दिला. 

दरम्यान, घाट बंद असल्याने गडावर गाड्या नाहीत. त्यामुळे सुरक्षारक्षक नितीन गोळे यांनी अमोल पढेर याचा भाऊ व वन समितीचा सुरक्षा रक्षक विठ्ठल पढेर,  सामाजिक कार्यकर्ते माऊली कोडीतकर यांना त्यांना आणायला पाठविले. त्यांनी अमोल पढेर यांच्या नव्या गाडीतुन त्यांना आतकरवाडीत साडे नऊ वाजता सोडले. तेथून त्यांच्या मोटारीतून तिला पुण्याला नेले.

Web Title: Pune news women collapsed in Singhgad vally