तुटलेल्या नातेसंबंधांतूनच महिलांचे खून

तुटलेल्या नातेसंबंधांतूनच महिलांचे खून

पुणे - सोशल मीडियाच्या प्रभावामुळे कौटुंबिक नातेसंबंधांवर आघात होत आहेत. हे नवीन माध्यम महिलांबाबत घडणाऱ्या गुन्ह्यांचे मूळ असल्याचे सांगितले जाते. त्यातूनच तुटलेले नातेसंबंध हेच शहरात झालेल्या महिलांच्या खुनाचे प्रमुख कारण असल्याची माहिती ससून शवविच्छेदनाच्या विश्‍लेषणावरून पुढे आली आहे. 

ससून रुग्णालयात सप्टेंबर २०१४ ते सप्टेंबर २०१६ या दरम्यान ११ हजार ७०२ शवविच्छेदन झाले. त्यापैकी २०७ (१.७६ टक्के) खुनाच्या घटना होत्या. या खून झालेल्या २०७ मृतदेहांच्या विश्‍लेषणाच्या आधारावर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्याय वैद्यकशास्त्र विभागातील डॉ. अजय तावरे, डॉ. राहुल खाडे आणि डॉ. हरीश ताटीया यांनी शोधनिबंध केला आहे. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.

खून झालेल्यांमध्ये ८० टक्के पुरुष, तर २० टक्के महिला होत्या. या २० टक्‍क्‍यांपैकी ८५ टक्के महिला विवाहित असल्याची नोंद झाली आहे. या अभ्यासात खून करण्याच्या उद्देशावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यात नातेसंबंध तुटल्याने ५७ टक्के महिलांचा खून झाल्याचा निष्कर्ष निघाला आहे. हे महिलांमधील खुनाचे कारणांपैकी एक प्रमुख कारण असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे. सूड हे ३७ टक्के पुरुषांच्या खुनाचे कारण होते, तर त्याखालोखाल आर्थिक कारण असल्याचे पुढे आले आहे.

खुनांमध्ये तरुणांची संख्या जास्त
शहरात गेल्या दोन वर्षांमध्ये झालेल्या खुनांमध्ये ३६ टक्के तरुण होते. त्यांचे वय २१ ते ३० या दरम्यान होते. ३१ ते ४० या वयोगटातील २९ टक्के तरुणांचा खून झाला होता.

सोशल मीडियाद्वारे अनेकविध थरांतील व्यक्ती एकत्र येतात. या जवळिकीमुळे कौटुंबिक बंध सैलावून अखेरीस तुटण्याची भीतीही निर्माण होते. त्यामुळे कुटुंबांमध्ये ताण येतो. नातेसंबंध तुटल्याने पती-पत्नींमध्ये गैरसमज निर्माण होतो. त्याचे पर्यवसान खुनासारख्या दुर्दैवी घटनेमध्ये होऊ लागले आहे.’’
- ॲड. सुप्रिया कोठारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com