अखंड लाकडात सहा फुटांची मूर्ती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

पुणे - अखंड लाकडात कोरलेली सहा फुटांची गणपतीची मूर्ती... पंचधातूपासून आकाराला आलेल्या भूदेवी-विष्णू-श्रीदेवी यांची मूर्ती... बुद्ध, दशावतार, सत्यनारायण, नृत्य करणारा- बासरी वाजविणारा गणपती, विविध मूर्तीवर केलेली वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर... हा तमिळनाडूमधील कलाविष्कार पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे.

तमिळनाडूमधील कारागिरांना व्यासपीठ मिळावे म्हणून तमिळनाडू सरकारचा हस्तकौशल्य विभाग आणि पुमपुहर संस्थेच्या वतीने कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्‌घाटन  महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. 

गणपतीबरोबरच पार्वतीची विविध रूपे, समईवरील कलाकुसर, शंकराचा रुद्रावतार... लक्ष वेधून घेत आहे. टिळक स्मारक मंदिर येथे सोमवारपर्यंत (ता. ३१) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले असेल.

Web Title: pune news wood Ganapati idol