यात्रेतील व्यावसायिकांना तळेगावात आपुलकीचा घास

गणेश बोरुडे 
सोमवार, 19 मार्च 2018

एरव्ही यात्रा म्हटले कि स्थानिक प्रशासनाची जागाभाडेपावती,देवस्थान कमिटीची वर्गणी अथवा स्थानिक टवाळखोरांच्या मुजोरीचा जाच हातावर पोट भरणार्या गोरगरीब पथारी विक्रेत्यांना सोसणे आलेच. शिवाय दुकान मांडण्यासाठी जागेची उपलब्धता आणि यात्रा भरते त्या ठिकाणच्या स्थानिक रहिवासी अथवा दुकानदारांचा तुसडेपणा ठरलेलाच.

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज यात्रौत्सवात गुढी पाडव्याच्या दिवशी विहिंप बजरंगदलातर्फे पुरी भाजीचे १२०० फुड पॅकेंट वाटप करुन आपुलकीचा घास भरवण्यात आल्याने बाहेरगावहून वस्तू विक्रीसाठी आलेले हजारो पथारी,विक्रेते व्यावसायिक पाहुणे गहिवरले.

एरव्ही यात्रा म्हटले कि स्थानिक प्रशासनाची जागाभाडेपावती,देवस्थान कमिटीची वर्गणी अथवा स्थानिक टवाळखोरांच्या मुजोरीचा जाच हातावर पोट भरणार्या गोरगरीब पथारी विक्रेत्यांना सोसणे आलेच. शिवाय दुकान मांडण्यासाठी जागेची उपलब्धता आणि यात्रा भरते त्या ठिकाणच्या स्थानिक रहिवासी अथवा दुकानदारांचा तुसडेपणा ठरलेलाच. मात्र मावळची सांस्कृतिक नगरी तळेगाव दाभाडे मधील जाणकार युवक मंडळींनी वर्गणीचा पायंडा गेल्या काही वर्षांपासून कायमचा मोडीत काढलाय असल्याचे नगरसेवक अमोल शेटे म्हणाले.पश्चिम महाराष्ट्र बजरंग दल संयोजक संतोष भेगडे पाटील यांच्या कल्पनेतून यंदाच्या डोळसनाथ यात्रौत्सवात बाहेगावहून साहित्य,माल विक्रीसाठी येणार्या व्यावसायिकांना घर वा गाळयासमोर दुकान मांडण्याबद्दल विरोध वा तुसडेपणा न करण्याचे आवाहन करण्यात आले.

विशेष म्हणजे याहीपुढे जाऊन या गोरगरीब व्यावसायिकांना अल्पोपहार देण्याचे आठवडाभर अगोदरच नियोजन करण्यात आले.काही दानशुर मंडळींनी देखील यासाठी हातभार लावला.त्यानूसार श्री डोळसनाथ महाराज यात्रौत्सवात रविवारी दुपारी वर्ष प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल तळेगाव खंडातर्फे अन्नपुर्णा उपहार म्हणून पुरी भाजीचे १२०० फुड पॅकेंट वाटप करण्यात आले.संतोष भेगडे पाटील, उपनगराध्यक्ष सुनिल शेळके,पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील,नगरसेवक अमोल शेटे,संतोष भेगडे पाटील, रविंद्र भेगडे, लक्ष्मण माने, संजय बाविस्कर आदींसह मान्यवरांनी स्वतः यात्रेच्या गर्दीत घुसून अल्पोपहाराची पाकिटे व्यावसायिकांना दिली. इतर ठिकाणच्या यात्रांमधील स्थानिकांची मुजोरी अनुभवणार्या व्यावसायिकांना तळेगावकरांकडून अशा प्रकारचा अनोखी सहानुभुती आणि आपुलकीचा घास मिळाल्याने गहीवरलेल्या हजारो पथारी,विक्रेते व्यावसायिकांनी आपसुकस कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.विनीत भेगडे,विनय सोरटे,राकेश ओसवाल,शिवनाथ भेगडे,निलेश शहा,मयुर पिंगळे,अभिमन्यु भेगडे,गोविंद एैनापार्थी आदींसह कार्यकर्त्यांनी नियोजनासाठी परिश्रम घेतले

Web Title: Pune news Yatra in Talegaon

टॅग्स