खेळताना फिट येऊन पडल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू

दिलीप कुऱहाडे
मंगळवार, 2 जानेवारी 2018

येरवड्यातील अग्रसेन हायस्कूलमधील घटना

येरवडा (पुणे): अग्रसेन हायस्कूलमधील इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थी शारीरिक शिक्षणाच्या (पीटी)च्या तासाला फिट आल्यामुळे खाली कोसळला. त्याचा कोरेगाव पार्क येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतरच विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, असे येरवडा पोलिसांनी सांगितले.

गणेशनगर, विडीकामगार वसाहतीमधील यश नारायण धर्मपालकांबळे (वय 13) आज (मंगळवार) सकाळी ‘पीटी’च्या तासाला मैदानात खेळत होता. यावेळी शारीरिक शिक्षक सुर्यकांत साजगुरे, राजेंद्र शिंदे विद्यार्थ्यांचे खेळ घेत होते. त्यावेळी अचानक यश फिट आल्यामुळे जमीनीवर कोसळला. शिक्षकांनी त्याला रिक्षामधून येरवड्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र, रुग्णालयाने अतिदक्षता विभाग असलेल्या रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितले. त्यानंतर त्याला कोरेगाव पार्क येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार दरम्यान यशचा मृत्यू झाला.

शवविच्छेदनानंतरच यशच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, असे येरवडा पोलिसांनी सांगितले. यश हा शांत विद्यार्थी होता. त्याची लहान बहिण याच शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. तर त्याचे वडिल रविवार पेठेतील एका दुकानात सेल्समन आहेत. यशचा मृत्यू दुदैवी असून, गेल्या पंचवीस वर्षांतील ही पहिलीच घटना असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका मिना मारवा यांनी सांगितले.

Web Title: pune news yerawada agrasen high school yash dharmpalkamble passes away