सर्व काही "कलरफुल' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

पुणे - मनसोक्त भटकंतीसाठी पावसात काहीतरी हटके करण्याचा तरुणाईचा प्लॅन असतो. पार्टीवेअर बाजूला सारून बिनधास्त कॅरी करता येईल, अशा वस्तू वापरण्याकडे आजच्या "यूथ'चा कल आहे. टू-पीस जीन्स, थ्री-फोर्थ जीन्स आणि डार्क कलरचे प्रिटेंड टी-शर्ट बाजारपेठेत आले आहेत. याच ट्रेंडचा घेतलेला आढावा. 

पुणे - मनसोक्त भटकंतीसाठी पावसात काहीतरी हटके करण्याचा तरुणाईचा प्लॅन असतो. पार्टीवेअर बाजूला सारून बिनधास्त कॅरी करता येईल, अशा वस्तू वापरण्याकडे आजच्या "यूथ'चा कल आहे. टू-पीस जीन्स, थ्री-फोर्थ जीन्स आणि डार्क कलरचे प्रिटेंड टी-शर्ट बाजारपेठेत आले आहेत. याच ट्रेंडचा घेतलेला आढावा. 

कपड्यांपासून ते फुटवेअरपर्यंत अन्‌ दागिन्यांपासून ते मेकअपपर्यंत प्रत्येक गोष्टीत वेगळी स्टाइल जपण्यावर तरुणांचा भर आहे. फॅशनेबलपेक्षा सोबर कम कॅज्युअल लूकची क्रेझ असून बाजारपेठाही अशाच वेगळ्या धाटणीच्या वस्तूंनी फुलल्या आहेत. भटकंती करणाऱ्या आणि फिरायला जाणाऱ्यांसाठी थ्री-फोर्थ आणि प्रिटेंड टी-शर्टचा पर्याय वापरला जात आहे. तरुणाईचा फॅशन फंडा बदलत असून, त्यांची चॉइसही बदलल्याचे दिसून येईल. 

तरुणाईची पसंती 
- सुटसुटीत आणि लवकर वाळतील असे कपडे वापरण्यावर भर 
- तरुणींसाठी केप्रीज, स्कर्टस आणि थ्री-फोर्थचा हटके चॉइस 
- लाइटवेट डेनिम्स, नॉन क्रशेबल कॉटन्स आणि क्रेपीजही 
- थ्री-फोर्थ आणि प्रिटेंड टी-शर्टचा पर्याय 

बदललेला ट्रेंड 
प्रिंट, ऍबॅस्ट्रॅक्‍स कट्‌स, सिल्क किंवा जार्जेट प्रकारातील स्कार्फ, स्टोल्स बाजारात आले आहेत. वेगळ्या लूकसाठी मल्टिकलर स्टोनच्या दागिन्यांचा पर्याय उपलब्ध आहे. फुटवेअरमध्येही वेगळा ट्रेंड आला असून, शॉर्टच्या सोबतीला वॉटरप्रूफ व प्लॅस्टिकच्या स्लिपर्स आणि शूज आहेत. यात स्टायलिश लूक आणि रंगांमध्येही विविधता आढळेल. 

तरुणांसाठीचे पर्याय 
तरुणांसाठी बर्म्युडा, शॉर्ट जीन्स आणि थ्री-फोर्थचा चांगला पर्याय पाहायला मिळेल. शिवलेस जॅकेट आणि त्यात प्रीटेड टी-शर्टचा हटके लूक पसंतीस पडत आहे. सॅक्‍स, वॉटरफ्रूफ जॅकेट आणि गिर्यारोहकांसाठी रेनी सॅक्‍स आहेतच. त्याशिवाय बॅग कव्हरचा नवा प्रकारही आलाय. 

Web Title: pune news youth fashion

टॅग्स