प्रेयसीच्या खूनप्रकरणी युवकाला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

पुणे: किरकोळ कारणावरून प्रेयसीचा पेटवून खून करणाऱ्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी जन्मठेप आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला. जखमीने दिलेला मृत्युपूर्व जबाब आणि त्याला सरकार पक्षाने सादर केलेली साक्ष आणि परिस्थितीजन्य पुरावा आदी गोष्टी आरोप सिद्ध करण्यास पुरेशा ठरल्या.

जाफर मेहबूब शेख (वय 27) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर लिना जेम्स झेवीयर हिचा पेटवून देऊन खून केल्याचा आरोप ठेवला होता. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी नऊ जणांची साक्ष न्यायालयात नोंदविली. झेवीयर हिचा पोलिसांनी नोंदविलेला मृत्यूपूर्व जबाब, इतर साक्षीदारांनी त्याला दिलेली पूरक साक्ष न्यायालयाने ग्राह्य मानली.

विकासनगर, किवळे येथे फिर्यादीच्या घरी 25 मार्च 2011 मध्ये पेटवून दिले होते. आरोपी आणि युवतीचे एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. आरोपी हा तिच्या घरी कोणी नसताना तिला भेटण्यास जात असे. घटनेच्या दिवशी त्याने तिला फोन करून घराबाहेर बोलाविले होते. ती घराबाहेर आली नाही, त्याचा राग आला. त्याने घरात प्रवेश करून तिला तू घराबाहेर का आली नाहीस, असे विचारून शिवीगाळ आणि मारहाण केली. तिच्या अंगावर दिव्यातील रॉकेल ओतून पेटवून दिले. यानंतर युवतीचा चुलत भाऊ आणि चुलतीने तिला उपचारासाठी देहूरोड येथील रुग्णालयात दाखल केले होते. ती गंभीररीत्या जखमी होती. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला होता.

Web Title: pune news youth life imprisonment in murder case