पुण्यात कोयत्याने वार करून एकाचा खून

दिलीप कुऱहाडे
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

पुणे : चंदननगर येथे पूर्ववैमन्यस्यातून पवन बाबूराव कांबळे (वय 20, रा. काळूबाईनगर, थिटेवस्ती) याचा तिघांनी कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. 16) रात्री घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी किशोर शिंदे, अमर गाडे, सुजित जाधव यांना काही तासात अटक केल्याची माहिती चंदनगर पोलिसांनी दिली.

पुणे : चंदननगर येथे पूर्ववैमन्यस्यातून पवन बाबूराव कांबळे (वय 20, रा. काळूबाईनगर, थिटेवस्ती) याचा तिघांनी कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. 16) रात्री घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी किशोर शिंदे, अमर गाडे, सुजित जाधव यांना काही तासात अटक केल्याची माहिती चंदनगर पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गेल्या वर्षी कांबळे याने शिंदेच्या डोक्यात कोयता टाकून गंभीर जखमी केले होते. याचा राग मनात ठेऊन संशयीत आरोपी शिंदे, गाडे आणि जाधव या आरोपींनी कांबळेला शु्क्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घेरले. त्यांनी त्याला कोयत्याने, लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून खून केला. त्यानंतर रात्री उशीरा पोलिस कर्मचारी दीपक चव्हाण व चेतन गायकवाड यांनी सुजित जाधव व अमर गाडेला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने जाधव व गाडेला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून शिंदेला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.'

कांबळेचा खून झाल्यामुळे थिटे वस्तीत आज (शनिवार) तणाव होता. कांबळे यांच्या पार्थिवावर येरवड्यातील स्मशानभूमित अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी काही अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कळत नाही का कामात आहे !
चंदनगर येथे शुक्रवारी रात्री पवन कांबळेचा खून झाला. मात्र, शनिवारी दुपार पर्यंत चंदनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. याबाबत तपास अधिकारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) सत्यवान पाटील यांच्याशी वारंवार संपर्क करून सुध्दा त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करून तुम्हाला कळत नाही का कामात आहे, असे सुनावले. वरिष्ठांकडे या बाबत तक्रार करू असे विचारल्यावर कोणाकडेही तक्रार करा, असे पाटील यांनी 'सकाळ'च्या प्रतिनिधीला प्रतिउत्तर दिले.

Web Title: pune news youth murder in chandannagar area