#PuneRains  रात्र पावसाची; आठ वर्षांतील उच्चांक

Pune Night rain
Pune Night rain

पुणे -  शहरात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात ९४ मिलिमीटर पावसाची नोंद २०११ मध्ये झाली होती. आठ वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात एका रात्रीत पाऊस पडल्याची (८७.३ मिलिमीटर) घटना पुण्यात घडली. मंगळवारी (ता. २४) रात्री साडेआठ ते बुधवारी (ता. २५) सकाळी साडेआठ या बारा तासांमध्ये हा पाऊस कोसळला. 

पुण्यात या वर्षी १ सप्टेंबर ते २४ सप्टेंबरदरम्यान ३२६.४ मिलिमीटर पाऊस पडला. त्यापैकी १४३.२ मिलिमीटर पाऊस अवघ्या ४८ तासांमध्ये पडला. यापूर्वी दहा वर्षांत इतक्‍या कमी वेळेत एवढा पाऊस पडल्याची हवामान खात्यात नोंद झालेली नाही. सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत काळे ढग आकाशात दाटून येतात. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ते गडद काळ्या रंगांचे होऊन विजांचा कडकडाट होऊ लागतो आणि जोरदार पावसाला सुरवात होते, असे चित्र दोन दिवस पुण्यात दिसत आहे, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 

   का कोसळला भयंकर पाऊस?
  अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्प येत आहे. 
  पुण्यात हवेतील आद्रतेचे प्रमाण ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे.

सकाळी आणि संध्याकाळी आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपर्यंत किमान तापमानाचा पारा ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. दिवसभर आकाश ढगाळ असले तरीही उन्हाचा चटका जाणवत होता. यापूर्वी काही दिवस २७ ते २८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले जात होते. त्यामुळे कमाल तापमान तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढले होते. त्याच वेळी हवेतील आद्रतेचे वाढलेले प्रमाण यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले. तसेच, स्थानिक वातावरणाच्या बदलांमुळे हा पाऊस पडला.
- डॉ. अनुपम कश्‍यपी, हवामान शास्त्रज्ञ, भारतीय हवामान विभाग.

पुण्यात सप्टेंबरमध्ये पडलेला पाऊस (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये)
वर्ष ................. पडलेला पाऊस 
२००९ ............१५७.६
२०१० ............ २०९.४
२०११ ............ ४०५.४
२०१२ ............ ९४.४
२०१३ ............ ४४४.२
२०१४ ............ ३४०
२०१५ ............ ३४७
२०१६ ............ १०७.४
२०१७ ............ २९८.८
२०१८ ............ ६२
२०१९ ............ ३२६.४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com