Pune : बिबट्याची चक्क निरगुडसर गावातच एन्ट्री....

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढ
leopard
leopardsakal

निरगुडसर : निरगुडसर परिसरात आत्तापर्यंत बिबट्या शेतावरच डरकाळी फोडत होता परंतु मंगळवारी रात्री चक्क बिबट्याने गावातच एन्ट्री केली असून नागरिक धास्तावले आहेत गावातील असलेल्या बाजार तळावरच बिबट्या उभा येऊन ठाकल्याने आता शेतावरचा बिबट्या गावात घुसू लागल्याने परिस्थिती गंभीर होत आहे.

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे,ऊसाची तोडणी सुरू असल्याने शेतातील बिबट्या आता गावाकडे वळू लागले आहेत मंगळवार ता.२१ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निरगुडसर आरोग्य केंद्रा शेजारून जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या बाजार तळावर बिबट्या डरकाळी फोडत होता त्या रस्त्यावरून मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जवळे येथील युवा कार्यकर्ते शेखर खालकर व राहुल दळे हे चारचाकी वाहनातून जात होते यावेळी अचानक बिबट्या डरकाळी फोडत बाजार तळावर उभा असलेला बिबट्या गाडी समोरून आडवा जाऊन पलीकडे जाऊन उभा राहिला, पलीकडे जाऊनही बिबट्या उभाच होता.

आरडा ओरड केलं तरी बिबट्याने काही जागा सोडली नाही आता शेतावरील बिबट्या नागरी वस्तीतील गावांमध्ये घुसू लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.ज्या ठिकाणी बिबट्या दिसला त्या ठिकाणी निरगुडसर गावचा बाजार भरतो अशा ठिकाणी गावांमध्ये बिबट्या घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे निरगुडसर येथील चैत्रोबावस्ती परिसरात गेल्या महिन्याभरात पाच ते सहा वेळा बिबट्याचे दर्शन होऊन देखील वनविभाग मात्र सुस्त आहे,कुठलीही दक्षता म्हणून घटनास्थळी येत नाही पिंजरा लावला जात नाही त्या ठिकाणी येऊन पाहण्याची सुद्धा तसदी वन विभाग घेत नाही आता माणूस मेल्यावर वन विभाग जागा होणार का? असा प्रश्न उपस्थित राहत आहे तरी निरगुडसर परिसरात तातडीने दोन ते तीन पिंपरे लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी होत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com