पुण्यातील ब्लड बँकेने दिले 'एक्स्पायरी डेट' संपलेलं रक्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

पुणे : मंगळवार पेठ येथे असलेल्या ओम ब्लड बँकेने एका रुग्णासाठी 'एक्स्पायरी डेट' (मुदत संपलेले) रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केल्यानंतर याची दखल घेऊन एफडीएने तपासणी सुरू केली, अशी माहिती पुणे विभागाचे सहआयुक्त विद्याधर जावडेकर यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथील योगेश लासुरे यांना त्यांच्या पत्नीसाठी तातडीने बी पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता होती. यामुळे योगेश लासुरे हे मंगळवार पेठेतील ओम ब्लड बँकेमध्ये आले व त्यांनी पैसे देऊन रक्ताची पिशवी खरेदी केली. रक्ताची पिशवी घेऊन ते रुग्णालयात आले. रुग्णालयात आल्यानंतर रक्ताच्या पिशवीवर तारीख पाहिल्यानंतर ते हादरलेच. रक्ताच्या पिशवीवर 10 ऑक्टोबर 2018 ही एक्सपायरी डेट होती. आज 19 ऑक्टोबर 2018 ही तारीख आहे. त्यामुळे डॉक्टरांनी हे रक्त योगेश लासुरे यांच्या पत्नीला देण्यास नकार दिला.

योगेश लासुरे यांनी ओम ब्लड बँकेशी संपर्क साधला. यावेळी चुकीने या रक्ताच्या पिशवीवर पुढील महिन्याऐवजी या महिन्यातील 10 तारीख 'एक्स्पायरी डेट' म्हणून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानंतर योगेश लासुरे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे याबाबात तक्रार केली. याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केल्यानंतर याची दखल घेऊन एफडीएने तपासणी सुरू केली. दुसरीकडे ओम ब्लड बँकेकडून 'क्लेरिकल मिस्टेक'मुळे हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात येत आहे.

Web Title: pune om blood bank supply blood which expiry date is finished