0pulwama_1.jpg
0pulwama_1.jpg

पुणे : पुलवामा हल्ल्याप्रकरणी चाकणमध्ये एकास अटक

पुणे : पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणाशीसंबंध असल्याच्या संशयावरून बिहार दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चाकण येथून एकास ताब्यात घेतले. दोन दिवसांपुर्वी एटीएसने त्यास ताब्यात घेऊन गुरूवारी न्यायालयात हजर करुन पटना येथे नेले. 

शरीयत अन्वरउल्लहक मंडल (वय 19, रा. बीजापुर, नाडिया, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. पुलावामा येथील हल्ला झाला, त्यावेळी भारतीय लष्कराच्या सुरक्षा यंत्रणा कोठे कोठे तैनात आहेत, याबाबतची महत्वाची कागदपत्रे दोघांकडे होती. त्या दोघांना बिहार एटीएसने काही दिवसांपूर्वी अटक केली. त्यांची चौकशी करत असताना त्यांच्या संपर्कामध्ये मंडल असल्याचे एटीएसच्या चौकशीमध्ये पुढे आले. त्यानुसार, बिहार एटीएसने दोन दिवसांपुर्वी महाराष्ट्र एटीएसच्या सहाय्याने चाकण येथे सापळा रचून शरीयत यास ताब्यात घेतले. शरीयत हा चाकण येथे एका खोलीत वास्तव्य करत होता. 

एटीएसकडून दोन दिवस त्याची सखोल चौकशी करण्यात आली. त्यामध्ये शरीयत हा बांग्लादेशमध्ये बंदी असलेल्या 'इस्लामिक स्टेट ऑफ बांग्लादेश' या संघटनेशी संबंधीत असल्याची माहिती पुढे आली. संबंधीत संघटनेमध्ये तरुणांची भरती करण्यामध्ये शरीयतचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. त्याचबरोबर पुलावामासंबंधी यापुर्वी बिहार एटीएसने अटक केलेल्या दोघांशी संपर्कात असल्याच्या कारणावरुनही शरीयतकडे चौकशी सुरू आहे. दरम्यान त्यास गुरूवारी त्यास जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेऊन शरीयत यास बिहारला नेण्यात आले आहे. 

महाराष्ट्र एटीएसने एका बांग्लादेशीला बेकायदा वास्तव्य करत असल्याच्या कारणावरुन अटक केली. सलगर अली असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड प्राप्त झाले असून त्यास ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com