
Pune:कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेल्या कारवाई विरुद्ध शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन
पुणे - मांजरी येथे कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्याने दंडात्मक कारवाई केल्याच्या निषेधार्थ रयत क्रांती मोर्चा संघटनेच्यावतीने सोमवारी महापालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचा शेतकऱ्यांनी अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
बार्शी तालुक्यातील तावडी या गावतील शेतकरी 8 एप्रिल रोजी मांजरी भागातील ग्रामसेवक प्रशिक्षण जवळ परिसरात कांदा विक्री करीत होते. त्यावेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली.
शेतकऱ्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या. त्याच्या निषेधार्थ रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. या मोर्चात शेतकऱ्यांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
खोत म्हणाले, "25 गोणी कांद्याचे 40 हजार रुपये घेत असतील तर .शेतकऱ्यांना आपल्या मुला बाळांसाठी पैसे राहिले नाहीत, 20 वर्षापूर्वी कांदा 5 रुपये दराने, त्याच दराने आजही कांदा 5 रुपये दराने विक्री होत आहे.
असे असताना प्रशासन बळीराजाचा बळी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, कोण अधिकारी असेल त्यांचे कांदे सोलल्यायाशिवय राहणार नाही. वर्षभर काम करून ही पैसे निघत नसेल तर पुढील आंदोलन आक्रमक होईल"