ओशो आश्रमात धक्काबुक्की करणाऱ्या नऊजणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

ओशो आश्रमात घुसून ट्रस्टच्या विश्वस्तांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी आठ अनुयायांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime : ओशो आश्रमात धक्काबुक्की करणाऱ्या नऊजणांवर गुन्हा

पुणे - ओशो आश्रमात घुसून ट्रस्टच्या विश्वस्तांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी आठ अनुयायांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आंदोलनाच्या वेळी बंदोबस्तास असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी अन्य एका अनुयायांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माळ परिधान करून प्रवेश दिला नाही, या मुद्यावरून अनुयायांच्या एका गटाकडून व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. संबोधी दिनानिमित्त मंगळवारी अनुयायांनी आश्रमात प्रवेश देण्यावरून आश्रमासमोर आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीने अनुयायांना आश्रमात प्रवेश देण्यात आला. परंतु दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा आश्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही अनुयायांनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली, अशी फिर्याद धनेशकुमार जोशी ऊर्फ स्वामी ध्यानेश भारती यांनी दिली आहे. त्यावरून आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तसेच, या आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या अनुयायांना पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका अनुयायाने फिर्यादी पोलिस कर्मचारी गोकूळ परदेशी यांना धक्काबुक्की केली. तसेच, अन्य एका महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली. त्यावरून छत्तीसगड येथील एका २७ वर्षीय अनुयायांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.