पुणे : पार्किंग कर्मचाऱ्याने केली नागरिकास मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

पुणे : पार्किंगचे जादा पैसे मागितल्याचा जाब विचारल्यावरुन पार्किंगमधील कर्मचाऱ्याने एका नागरिकास जबर मारहाण करत त्यांच्या कारची तोडफोड केली. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजता नारायण पेठेतील शिवाजीराव आढाव वाहनतळ येथे घडली

पुणे : पार्किंगचे जादा पैसे मागितल्याचा जाब विचारल्यावरुन पार्किंगमधील कर्मचाऱ्याने एका नागरिकास जबर मारहाण करत त्यांच्या कारची तोडफोड केली. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजता नारायण पेठेतील शिवाजीराव आढाव वाहनतळ येथे घडली.

याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अरुण पुजारी, अभिजीत रमेश झोपे, आकाश अंकुश पिलाणे, गणेश बसप्पा जंगले, ऋतिक शेखर म्हेत्रे या पाच जणाना अटक केली असून 15 जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी दत्तात्रय भापकर (वय 47,रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: Pune: Parking staff beat civilians